मनोर-माहीम महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहनतळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालघर : मनोर-माहीम महामार्गावर शिवाजी चौक ते वळण नाका हा परिसर अवजड वाहतूक वाहनांसाठी वाहनतळ बनत चालला आहे. यामुळे इतर वाहनांना या रस्त्यावर अपघाताचे निमंत्रण मिळत आहे. याच कारणामुळे अनेक वेळा अपघातही घडले आहेत.
मनोर-माहीम महामार्गावर नेस्ट हॉटेलच्या समोर, अयप्पा मंदिरासमोर, टिं्वकल स्टार शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात, गणेशकुंडाच्या आधी अशा काही ठिकाणी अवजड वाहने दररोज उभी असतात. ही वाहने येथील अवजड वाहतूकदारांची असून त्यांचे मोठे राजकीय वजन आहे. त्या भीतीपोटी हाकेच्या अंतरावर असलेल्या चार रस्ता चौकीचे पोलीस या बेकायदा उभ्या ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करत नसल्याचे सांगितले जाते. ही वाहने नेस्ट हॉटेलपासून ते थेट गणेश कुंड परिसरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात. त्यामुळे हा रस्ता नव्हे तर अवजड वाहनांचा वाहनतळ बनला आहे. वाहतुकीसाठीही ही वाहने डोकेदुखी ठरत आहेत.
शिवाजी चौक ते वळण नाका या दोन ते तीन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये अनेक वळणे आहेत. नेमकी वळणे असलेल्या ठिकाणीच अवजड वाहने, टेम्पो, ट्रक उभे केलेले असतात. त्यामुळे वळण घेताना समोरच्याला जवळ असलेले वाहन दिसत नाही व परिणामी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याच बरोबरीने वाहने उभी केल्याने मागून येणारी वाहने समोरच्याला दिसत नाहीत. शेवटच्या क्षणी समोरून आलेली ही वाहने दिसत असल्यामुळे वाहन चालकांची भंबेरी उडत आहे. यामुळेही अपघाताची दाट शक्यता आहे.
दररोज ही अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा या परिसरात उभी करून ठेवलेली असली तरी पोलीस या वाहनांवर कारवाई करताना दिसत नाही. अवजड वाहतूकदारांसोबत पोलिसांचे साटेलोटे असल्यामुळ ते या ट्रक-टेम्पोवर कारवाई करत नसल्याचे काही सूत्रांकडून सांगितले जात आहे.
वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी
या रस्त्यावर दोन्ही बाजूला दररोज सुमारे २० ते ३० अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीलाही ही वाहने कारणीभूत ठरू लागली आहेत. पूर्वी पोलिसांनी कारवाई करून रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही वाहने हटवली होती. मात्र कालांतराने पुन्हा ही वाहने इथे उभी राहत असल्यामुळे इतर वाहनांसाठी ती अडचणीचे ठरत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या या वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी समोर येत आहे.