बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून होणार्‍या प्रदूषणाविरोधात परीसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोलवडे येथील नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची भेट घेत कारवाईची मागणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तारापुर औद्योगिक क्षेत्राजवळील कुंभवली येथील निर्जनस्थळी अज्ञात लोकांनी रसायनांची बेकायदा विल्हेवाट लावल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा कोलवडे गावाजवळून वाहणार्‍या मोरी खाडी या नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांमधून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते चोरीछुपे परीसरातील गटारे, नैसर्गिक नाले, खाडी आणि खाजण परीसरात बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या रासायनिक सांडपाण्यामुळे झाडे, खारफुटी नष्ट होत असून खाडी व समुद्रातील मासे व इतर जलचर मृत्यूमुखी पडून मच्छिमार व पर्यावरणाचे नुकसान होत आहे. त्याचसोबत परीसरातील भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत प्रदूषीत होऊन शेती-बागायती लागवडी योग्य जमीन नापीक बनत चालली असून नागरीकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार नागरीक करीत आहेत.

हेही वाचा : वाडा : पशुधनाची घटती संख्या एक चिंतेची बाब; दर पाच वर्षांनी होते २५ टक्क्यांनी घट

तारापुर औद्योगिक परीसरातील काही उद्योगांकडून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करून वारंवार रासायनिक सांडपाणी निर्जंस्थळी असलेले नैसर्गिक नाले आणि खाडी परीसरात बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढीस लागले असून याविरोधात कुंभवली व कोलवडे गावातील ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांच्याकडे तक्रार देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar at boisar chemical effluents into natural drains villagers demand strict action css