कासा : मुंबई- अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या चारोटी नाका येथील आरटीओ कॅम्पमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जागे अभावी सेवा रस्त्यावरच वाहन चालकांची अनियुक्त चाचणी केली जात आहे. तर डहाणू येथे डहाणू रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात चाचणी घेतली जाते. यामुळे रहदारीच्या रस्त्यावर चालकांना सनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून वाहतूक कोंडी सारखी समस्या निर्माण होत असल्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. आरटीओ कॅम्पसाठी कुठलीही जागा निश्चित नाही. यापूर्वी चारोटी येथे डहाणू- जव्हार ला लागून असलेल्या ओसाड व निर्जन सेवा रस्त्याला अनियुक्त चाचणी केली जात होती. त्या ठिकाणी अनेक सुविधांची वानवा असल्याने अखेर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या चारोटी येथील सेवा रस्त्यावर ही चाचणी सुरू करण्यात आली आहे.
समस्या मात्र तशाच आहेत. महिन्याच्या प्रत्येक बुधवारी दोन दिवस डहाणू आणि दोन दिवस चारोटी येथे कॅम्प भरतो. या ठिकाणी कामासाठी आलेल्या नागरिकांना थांबण्यासाठी कोठेही निवारा नाही. वन विभागाच्या जागेत उपलब्ध असलेल्या दोन छोट्या खोल्यांमध्ये परिवहन खात्याचे अधिकारी बसतात. कामकाजासाठी आलेले नागरिक भर ऊन, पावसात उभे असतात. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही या ठिकाणी सोयी चे नाही. जवळपास कोणतेही उपाहारगृह नाही, तसेच झेरॉक्स आणि स्टेशनरीचे दुकानही मैदानापासून दूर आहे. स्वच्छता गृह नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. येथील कोणतेही काम मध्यस्थाशिवाय होत नसल्याने अगदी किरकोळ कामासाठीही नागरिकांना अनेक तास वाट पाहत थांबावे लागते.
हेही वाचा : डहाणू : तीन राज्यांतील मच्छीमारांनी मिळून स्थापन केली इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन्स फेडरेशन
सेवा रस्त्यावर भरणाऱ्या कॅमम्वेळी येणारे नागरिक रस्त्यात वेडीवाकडी वाहने उभी करतात. यामुळे येथील शिस्तीचा आणि शांततेचा भंग होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणत सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन हा त्रास इतर वाहन चालकांना होतो. त्यामुळे आरटीओ साठी मोठं मैदान उपलब्ध करून मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तसेच वाहन चालकांची संख्या जास्त प्रमाणात वाढू लागल्याने आरटीओ अधिकाऱ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा : तारापूर येथे कामगाराचा मृत्यू, प्रकरण संशयास्पद असल्याचा कुटबियांचा आरोप
“प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन चालक परवान्यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर आणि डहाणू येथे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे शिबिर घेतले जाते. मात्र याठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू असल्यामुळे चालकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दोनही ठिकाणी खुले मैदान उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.” – नरेश पाटील, डहाणू