बोईसर : रेल्वे रुळालगत रील बनवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अवैधपणे पैशांची वसुली करणाऱ्या रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात येऊन पुढील कारवाई केली जाणार आहे. सोमवारी बोईसरच्या अवधनगर परिसरातील १६ ते १८ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी बोईसर स्थानकाजवळील रेल्वे रुळालगत मोबाईल मधून रील बनवत होते. यावेळी बोईसर रेल्वे स्थानकात कार्यरत रेल्वे पोलीस दलातील देवेंद्र कुमार, अरविंद सिंग आणि देवेंदर सिंग या तीन कर्मचाऱ्यांनी रिल बनवणाऱ्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन रुळालगत विनापरवानगी रील बनवण्याचे कारण देत कारवाई करायची नसेल तर पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र विद्यार्थ्यांकडे इतके पैसे नसल्याने त्यांना जवळपास तीन ते चार तास थांबवून ठेवण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा