बोईसर : पालघर तालुक्यात अपघातांची मालिका सुरू आहे. मागील तीन दिवसांत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी चहाडे- गुंदले रस्त्यावर टायर फुटून कार उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सफाळे जवळील भादवे गावातील तरुणांच्या कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. चहाडे गुंदले-रस्त्यावरील गर्वाशेत येथे कार उलटून झालेल्या अपघातात चंद्रकांत पाटील आणि उत्कर्ष राऊत या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर मयूर वैद्य, धीरज पाटील, मीत राऊत आणि लोकेश वैद्य हे चार तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बेटेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नागझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व तरुण जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

हेही वाचा : पालघर: टेम्पोच्या अपघातात बालकाचा मृत्यू, टेम्पो चालक गंभीर जखमी

शुक्रवारी संध्याकाळी बोईसर चिल्हार रस्त्यावरील गुंदले दोन बंगला येथील क्रॉसिंगवर भरधाव स्कॉर्पिओ जीपने अचानक वळण घेणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी बाळु हेमाडा यांचा वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून त्यांची पत्नी सुरेखा हेमाडा आणि राजेंद्र आहडी या दोघांवर उपचार सुरू आहेत. तर शनिवारी पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीतील वळणावर एक अवजड ट्रक टेम्पोवर उलटून झालेल्या अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar district 4 died and 7 injured in three different accidents within two days css