बोईसर : पालघर तालुक्यातील तारापुर जवळील कुडण येथे एका सात वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिलवासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर तालुक्यातील तारापुर जवळील कुडण येथे आपल्या कुटुंबियासोबत राहणारा प्रेम जितेंद्र पाटील (७) हा मुलगा मंगळवारी पहाटे सात वाजता दाट धुके असताना आपल्या घरापासून जवळच असलेल्या किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेला असताना त्याच्यावर अचानक एका प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याचा डोक्याला आणि चेहर्याला चावा घेण्याच्या आणि ओरबडल्याच्या गंभीर जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केल्यानंतर मुलाने जोरात आरडाओरड केल्याने जवळचे नागरीक धावून आले, तो पर्यंत दाट धुक्याचा फायदा घेत तो प्राणी पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रेम पाटील या मुलाला उपचारासाठी सिलावासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा