कासा : पालघर मधील तलासरी व डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. आज दुपारी १:४७ मिनिटांच्या सुमारास ३.४ रिष्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघर मधील डहाणू आणि तलासरी तालुक्यात २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू आहेत. या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भूकंपाचे हादरे जाणवत आहेत.
हेही वाचा : डहाणू: पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असमन्वयामुळे पाटाच्या पाणी प्रवाहावर परिणाम
अचानक पुन्हा सुरू झालेल्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा भीती पसरली आहे. भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून भूकंप प्रवण क्षेत्रात पुन्हा जनजागृती करून सुरक्षा साधनांचे वाटप करण्याची मागणी करण्यात येत आहे.