मनोर विक्रमगड मार्गावर भरधाव जाणाऱ्या रिकामी डंपरणे शिर्डी पालघर एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक लहान मुलाचा मृत्यू झाला असून २३ प्रवासी जखमी झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. विक्रमगड कडून मनोरकडे येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला दुपारी एक वाजल्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून सहा किलोमीटर अंतरावर बोरांडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये डम्पर धडक दिली. काही रुग्णांना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. इतर काही रुग्णांना मनोर येथील आस्था खाजगी रुग्णालयात तर काहींना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोरच्या पूर्वेकडील भोपोली भागा मधून मुरूम, माती व दगड उत्खनन करून त्याचा पुरवठा राष्ट्रीय प्रकल्पांसाठी अवजड वाहनातून केला जाते. वाहतूक करणारी अवजड वाहन भरधाव वेगाने जात असतात. अशाच एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खासदार राजेंद्र गावित यांनी भेट देऊन आणि केली तसेच मदत कार्यात हातभार लावला.