वाडा : तालुक्यात उत्पादित होणाऱ्या ‘वाडा कोलम’च्या तांदळाची मागणी देशात तसेच देशाबाहेर वाढल्याने या वाणाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. शिवाय यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर कृपादृष्टी दाखविल्याने उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. तरी देखील या प्रसिद्ध वाणाच्या नावाखाली इतर वाण बाजारात सर्रास विकले जात आहेत. पालघर जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलमची लागवड करण्यात आली होती. या लागवडीतून ४२ हजार टन वाडा कोलम चे उत्पादन झाले असल्याची माहिती वाडा तालुक्यातील किरण ॲग्रो या कृषी उत्पादन कंपनी च्या किरण पाटील यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून भाताच्या या वाणाला मागणी वाढल्याने या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा कोलम जातीच्या भाताला मोठ्या प्रमाणात दाणे असलेले लोंम्ब येत असतात. परिणामी भात पिकण्याच्या अवस्थेत लोंबाच्या वजनाने भात पिकाच्या काड्या जमिनीच्या दिशेने झुकल्या जातात. अशावेळी वादळी वातावरण अथवा परतीच्या पावसाच्या जोरदार सरी झाल्यास तयार झालेला दाणे जमिनी वर पडून उत्पादकतेवर परिणाम करत असत. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यानंतर विशेष पाऊस न झाल्याने परतीच्या पावसामुळे होणारे नुकसान अत्यल्प प्रमाणात झाल्याने उत्पादकतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : पालघर, डहाणू तालुक्यात पावसाचा तडाखा; शेतकरी, गवत पावळीचे व्यापारी आणि विट उत्पादक धास्तावले

‘वाडा कोलम’ सोबत सुपर वाडा कोलम, वाडा पोहा, वाडा झिनिया, समृद्धी अशा नवीन वाणांचेही बियाणे विकसित केले जात आहे. यावर्षीच्या खरिप हंगामात कोकण व विदर्भात वाडा कोलम या वाणाचे बियाणे ५२१ टन वितरीत करण्यात आले होते अशी माहिती पुढे आली आहे.

१७२० क्विंटल बियाणाचा पुरवठा

पालघर जिल्ह्यातील जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी वाडा कोलम या वाणाच्या बियाणाची प्रति १० किलो वजनाच्या १७२०० पिशव्या वाडा कोलम बीज उत्पादन कंपनीकडून खरेदी केल्या होत्या. या वर्षापासुन नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होऊन ४२ हजार टन पेक्षा अधिक वाडा कोलम चे उत्पादन मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी लागवडीचे क्षेत्र वाढल्याने व चांगला पाऊस, वातावरणामुळे वाडा कोलम चे उत्पादन यावर्षी दीडपटीने वाढले आहे.

वाडा कोलम ची होते नक्कल, ग्राहकांची फसवणूक

वाडा कोलम तांदळाची वाढती मागणी लक्षात घेता काही व्यापाऱ्यांनी वाडा कोलम सारखाच दिसणा-या तांदळाची विक्री वाडा कोलाम म्हणून होत असल्याचे दिसून येत आहे. माध्यम, पाणेदार दाणा, साधारण तपकिरी असलेला हा तांदूळ शिजल्यावर मऊ व अत्यंत चवदार असतो. या तांदळाने कोट्यवधी खवय्यांना भुरळ घातल्याने दरवर्षी या वाणाची मागणी वाढत आहे.

हेही वाचा : शहरबात : संपर्क यात्रा प्रचारात निष्प्रभ

वाडा कोलम कसा ओळखायचा ?

इतर भाताच्या वाणाच्या प्रमाणे व कोलम प्रमाणे वाडा कोलम चा तांदूळ हा शुभ्र पांढरा नसून काही प्रमाणात पिवळट तपकीरी रंगाचा असतो. हा तांदूळ बारीक कोलम तांदळाच्या दाण्यापेक्षा अधिक जाडसर असून हा तांदूळ शिजवल्यानंतर त्यावर टाकण्यात येणाऱ्या डाळ, आमटी अथवा इतर द्रव्यांना शोषून घेण्याची क्षमता अधिक असते.

यंदा परतीच्या पावसा चा विशेष फटका वाडा तालुक्यात बसला नसल्याने वाडा कोलमच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शिवाय या वाणाला असलेल्या मागणीमुळे लागवड क्षेत्रांमध्ये देखील गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. – रोहिदास पाटील, शेतकरी/ रिगन राईस मिल, खैरेवाडा), वाडा

महामंडळाकडून वाडा कोलमला दर नाही

आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाताची खरेदी केली जाते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल आधारभूत खरेदी किंमतीपेक्षा जास्त उत्पादन खर्च वाडा कोलम उत्पादनासाठी येत असल्याने वाडा कोलम चे भात खरेदी केंद्रावर शेतकरी विकत नाहीत. त्यामुळे भात गिरणीतून भरडाई करून तांदूळ विक्री करणे पसंद करतात.