कासा : आज पहाटेच्या सुमारास तलासरी येथील रिक्षाचालक चारोटीकडून तलासरीच्या दिशेने जात असताना महालक्ष्मी मंदिराजवळ अपघात झाला. रिक्षाचालकाने समोर बंद असलेल्या ट्रकला पाहून रिक्षा थांबवली असता, मागून येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरात धडक दिली. या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला तर रिक्षाचालक अरविंद वाघ (वय ४२ वर्ष रा. तलासरी) यांचा जागीच मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज पहाटे तलासरी येथील रिक्षालाचालक अरविंद वाघ हे वेदांत रुग्णालय येथून भाडे घेऊन विक्रमगडला गेले होते. विक्रमगड येथे रुग्णाला सोडून तलासरीकडे जात असताना महालक्ष्मी मंदिर परिसरात समोर ट्रक उभा असल्याने त्यांनी रिक्षा थांबवली. पाठीमागून येणाऱ्या ट्रकला समोर उभ्या असलेल्या ट्रकचा व रिक्षाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रकने रिक्षाला जोरात धडक दिली. रिक्षा बंद पडलेला ट्रक व पाठीमागून आलेला ट्रकच्या मध्ये अडकून चेंगरला गेला. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचा चुराडा झाला.

हेही वाचा : काँक्रिटीकरणाचे काम नियोजन व समन्वयाद्वारे करावे, जिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सक्त सूचना

अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत दोन्ही ट्रकचालकांना ताब्यात घेतले व अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. पुढील तपास कासा पोलीस करत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar on national highway near mahalaxmi temple auto rickshaw driver died in accident css