बोईसर : कारखान्यातील रासायनिक सांडपाणी आवश्यक प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्यामध्ये सोडल्याप्रकरणी तसेच आवश्यक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तारापुर औद्योगिक क्षेत्रातील आरे ड्रग्स या कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली. प्रदूषीत रासायनिक सांडपाणी पास्थळ येथील नैसर्गिक नाल्यात आणि दांडी खाडीत सोडल्याप्रकरणी या कारखान्याला २८ डिसेंबर २०२२ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन खुलासा मागवण्यात आला होता. मात्र या प्रकरणी झालेल्या सुनावणीत कारखाना व्यवस्थापनाने समाधानकारक खुलासा आणि पाच व दहा लाखांची बँक हमी जमा केली नव्हती तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्दशांचे अनुपालन करण्यास अपयशी ठरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून रासायनिक सांडपाणी विनाप्रक्रिया उघड्यावर सोडत असल्याचे चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. त्याअनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारांची औद्योगिक वसाहतीच्या प्लॉट क्र ई- ३४ वरील मे. आरे ड्रग्स आणि फार्मास्युटीकल लिमिटेड या कारखान्याला २५ नोव्हेंबर रोजी पाहणी केली होती. कारखान्यात उत्पादन करताना निर्मिती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून आले. तसेच कारखान्यातील सांडपाणी हे नाल्यातील सांडपाण्याच्या पृथ्यकारणाशी मिळते जुळते चालायचे आढळून आले. कंपनी मधील अवाक पाणी आणि विसर्ग झालेल्या सांडपाण्याचा ताळमेळ बसत नसून नाल्यात विना प्रक्रिया सांडपाणी सोडत असल्याचे कारणावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद करण्याची करावी केल्याचे ७ डिसेंबर रोजी च्या आदेशात उल्लेखित आहे. कारखान्याचा पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश देखील काढण्यात आला आहे.

हेही वाचा : पालघर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध समित्या निष्क्रिय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला बोगस डॉक्टरचा शोध

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाजाने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत राष्ट्रीय हरीत लवादाने कारखानदार आणि टीईपीएस यांना प्रदूषणाची भरपाई म्हणून सुमारे १६० कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असताना वेगवेगळ्या छुप्या मार्गाने घटक सांडपाणी सोडण्याचे प्रकार घडत असून त्यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातील तिसरे “मधाचे गाव” घोलवड

या भागातून होणार्‍या प्रदुषणामुळे परीसरातील मानवी जीवन, पर्यावरण, पाण्याचे स्त्रोत आणि सागरी जलचर यांना अपरीमीत धोका पोचत असून दंडात्मक कारवाई नंतर देखील प्रदूषणाची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी औद्योगिक क्षेत्रातील वायू व जल प्रदूषण याची गंभीर दखल घेत संबंधित विभाग यांना कारवाई बाबत निर्देश दिले असून रात्रीच्या वेळी टँकर वाहतुकीवर निर्बंध लादले असले तरीही त्याचे अनुपालन होत नसल्याने या भागातील प्रदूषण कायम राहिले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar production ban on aarey drugs factory due to its pollution css
Show comments