पालघर/डहाणू: डहाणू शहरातील नागरिकांसाठी सुजल निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. त्याचे काम अपूर्ण असताना  १५ डिसेंबर रोजी योजनेचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकडे स्थानिक नागरिकांकडून लक्ष वेधण्यात येत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीव श्रेय घेण्याच हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

डहाणू नगर परिषद हद्दीतील वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा तुटवडा लक्षात घेता सन २०१४ मध्ये डहाणू शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सुजल निर्माण योजने अंतर्गत तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून योजना राबवण्यात आली. या योजनेच्या काम  कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर २४ महिन्यांच्या आत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र,  ते पूर्ण न झाल्यामुळे त्याला वेळोवेळी  मुदतवाढ  देऊन शेवटी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली होती. अखेर ते काम पूर्ण झाल्याची घोषणा डहाणू नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अजूनही पाणीपुरवठा योजनेच्या कामात त्रुटी असून, संपूर्ण गावात पाणी पोहचण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare (1)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच काढलं
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

शहरातील प्रभू पाडा, रामटेकडी, आंबेमोरा, मांगेलवाडा, आगर, डहाणू गावातील मशिदीच्या पाठीमागील भागात व अन्य काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत सुरू नसल्याचे सांगितले जात आहे. तर वडकून पांचाळ हॉलच्या पाठीमागे असलेली पाण्याची टाकी गळत असल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण योजनेची तपासणी करताना जलकुंभ पूर्ण भरून ठराविक भागातील नगरसेवक व शेवटच्या उपभोक्ता यांच्या उपस्थितीत करण्याची अट असताना तसे करण्यात आले नसल्याची तक्रार जाणकारांनी केली आहे. असे असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना अपूर्ण असतानाच योजना पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

डहाणू नगर परिषद अंतर्गत राबवण्यात आलेली ही योजना आठ वर्षांनंतर ही अपूर्णच आहे. शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होत असल्याचे आढळून आले आहे. असे असताना नगरपरिषद कडून पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आल्यामुळे नगर परिषद च्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित राहत आहेत.प्रकाश अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्ते

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुजल निर्माण पाणीपुरवठा योजना डहाणू शहरासाठी राबवण्यात आली होती. या योजनेचे काम आराखडय़ा प्रमाणे पूर्ण झाले असून या बाबतचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार या योजनेचे उद्घाटन करण्यात येत आहे. शहरातील काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या ठिकाणी उपाय योजना करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.

वैभव आवारे, मुख्याधिकारी डहाणू नगरपरिषद

Story img Loader