पालघर : शनिवारी (३० डिसेंबर) दुपारी शिर्डी पालघर बसला एका डंपरने धडक दिल्यानंतर जागीच मृत पावलेल्या ११ महिन्याच्या आदित्य गवते याचा पाच वर्षीय थोरला भाऊ हर्षद गवते याने आपले वडील पोहोचतात मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल रात्री प्राण सोडले. रुग्णालयात गंभीर असलेल्या हर्षलला योग्य उपचार मिळाले नसल्याचे मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे असून जखमींना बघण्यासाठी अथवा त्याला मदत करण्यासाठी मृत्यूपर्यंत एसटी महामंडळाची प्रतिनिधी अथवा डंपर मालक पोहोचले नाहीत.
३० डिसेंबर दुपारी रिकामी असणाऱ्या एका गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर ने एसटी बसला जोरदार धडक दिल्यानंतर ११ महिन्याचा आदित्य जागी मृत पावला. त्यानंतर गंभीर असणाऱ्या त्याच्या भावाला प्रथम डहाणू येथील वेदांत रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला शनिवारी रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या रुग्णाला योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार दिले जात असल्याचे हर्षदच्या नातेवाईकांनी कळवल्यानंतर या संदर्भातील माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. उपचारादरम्यान औषध आणण्यासाठी गवते कुटुंबीयां पुरेसा पैसा उपलब्ध नव्हता. त्याला अंबु बॅग द्वारे प्राणवायू पुरवठा केला जात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी लोकसत्तेला सांगितले आहे.
दरम्यान जखमी असलेल्या हनुमंत गवते आपल्याला लहान मुलावर जव्हार झाप (चिंच वाडी) येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर रविवारी सायंकाळी उशिरा केईएम रुग्णालयात आपल्या थोरल्या मुलाला भेटण्यासाठी गेले. मात्र त्याच दरम्यान रात्री ९३० च्या सुमारास हर्षद ने आपले प्राण सोडले. कामाच्या शोधात पालघर येथे कुटुंबासह येत असणाऱ्या गवते कुटुंबीयांनी आपली दोन्ही मुले गमावल्याने गवते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डहाणू येथील वेदांत रुग्णालयात गंभीर असणाऱ्या इतर तीन रुग्णांना वापी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवल्याची माहीती पुढे आली आहे.
हेही वाचा… नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात
मृत्यूनंतर एसटीची मदत
उपचारासाठी औषध आणण्यासाठी पैशाची आवश्यकता भासत असताना २४ तास उलटल्यानंतर देखील एसटी महामंडळाच्या कोणत्याही प्रतिनिधी केईएम रुग्णालयात पोहचू शकला नव्हता. हर्षदचा मृत्यू झाल्यानंतर परळ कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गवते कुटुंबियांची भेट घेतली व मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी पैशाची तरतूद केल्याचे कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले.
हेही वाचा… भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आंबेडकरी अनुयायांचे अभिवादन; अलोट गर्दी
डंपर मालकीबाबत संभ्रम
अपघात जास्त डंपर ही मालकी कोणाची व कोणाच्या सेवेत कार्यरत होता याबाबत वेगवेगळे मतप्रवाह पुढे येऊ लागले आहेत. हा डंपर पूर्वी एका सत्ताधारी गटाच्या प्रभाशाली नेत्याच्या ठेक्याअंतर्गत काम करत असल्याचे प्रथम पोलिसांनी सांगितले. मात्र नंतर पोलिसांनी सावरा सावर करत डंपर मालक स्वतः गौण खनिज वाहतूक करत असल्याची माहिती पत्रकारांना दिली. इतका मोठा अपघात घडल्यानंतर देखील जखमींना मदत करण्यासाठी कोणताही निधी डंपर मालकाने दिला नसल्याची माहिती पुढे आले आहे. या सर्व घटनेत एस टी महामंडळ तसेच अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या डंपर मालकाच्या असंवेदनशील भूमिकेबद्दल परिसरामध्ये तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.