नीरज राऊत

पालघर : बचत गटात तयार केलेले गृह उपयोगी व खाद्यपदार्थांची शहरी भागात विक्री करताना इंग्रजीचा येणारा अडथळा दूर करण्यासाठी डहाणू तालुक्यातील पेठ गावातील भगिनींसाठी एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या गृहस्थाने इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे या इंग्रजी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एक भगिनी निरक्षर असून इंग्रजी बोली शिकण्याची जिज्ञासा या महिलेने कायम ठेवली आहे.

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Redevelopment of government leased building with express intention of catering to builder lobby by MLA
मला अखेरपर्यंत याच घरात रहायचे आहे…
loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
fee structure photo viral
शाळेच्या मुलांसाठी एवढी फी? फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटिझन्स म्हणतात, “पॅरेंट ओरिएंटेशन फी..”!
 ‘मायक्रोफायनान्स’ संस्थांना अवाजवी कर्ज देण्यापासून परावृत्त करणे आवश्यक
Enrol in a training institute and get a free tablet lure to students from institutes
“प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्या अन् मोफत ‘टॅबलेट’ मिळवा”, संस्थांकडून विद्यार्थ्यांना आमिष
akshaya deodhar put up a puneri pati in her a new saree shop
“वस्तू मिळतात अन्…”, अक्षयाने साड्यांच्या दुकानात लावली हटके ‘पुणेरी पाटी’! पाठकबाईंनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

आयबीएम कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केल्यानंतर २००३ मध्ये निवृत्ती घेतलेले वेंकट अय्यर (५७) हे सपत्नी डहाणू तालुक्यातील पेठ गावात चार एकर जागा खरेदी करून नैसर्गिक शेती करू लागले. काही वर्षांनी त्यांनी लगतच्या भागात आठवी नववी इयत्ता शिकणाऱ्या महिलांना एकत्र करून बचत गटाची स्थापना केली. ज्या बचत गटामार्फत गृह उपयोगी वस्तू तसेच पापड, लोणची, करंजी, तिळगुळ इत्यादी खाद्यपदार्थ तयार करून मुंबई येथे असलेल्या आपल्या परिचित व्यक्तींपर्यंत त्याची विक्री करू लागले. आरंभी बचत गटाला ऑर्डर मिळवण्यासाठी देखील व्यंकट अय्यर यांनी मदत केली.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: “…हे एकाही भारतीयाला मान्य होणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

बचत गट स्वयंपूर्ण होऊ लागल्यानंतर इंग्रजीमध्ये मागणी ऑर्डर स्वीकारणे, इंग्रजीत आलेले मेसेज संदेश समजून घेणे तसेच इंग्रजी मधून संभाषण करणे कठीण झाल्याने या महिलांना प्रत्येक वेळी व्यंकट यांच्याकडे मदतीसाठी यावे लागेल. त्यावर तोडगा काढण्यासाठी त्याला इंग्रजी स्वयंपूर्ण करणे हाच मार्ग असल्याचे समजल्यानंतर त्यांनी महिलांची मानसिक तयारी केली. बोईसर डहाणूपासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असणारे या दुर्गम गावी कोणी शिक्षक यायला तयार नसल्याने सेटअप फॉर इंडिया या इंग्रजी मराठी परस्पर संवादी पुस्तकाच्या माध्यमातून इंग्रजीचे धडे देण्यास सुरू केले आहे.

नारीशक्ती उत्पादक गटाच्या या १२ महिला जुन्या पंचायतीच्या शाळेमध्ये दररोज तीन वाजल्यापासून तास-दीड तास इंग्रजीचे अध्ययन करत असून आजवर त्यांनी इंग्रजीच्या ५०० शब्दांचे ज्ञान हस्तगत करण्याच्या टप्प्याटप्प्यात प्रयास करीत आहेत. सध्या आलेल्या भ्रमणध्वनी कॉल ला ‘येस, ओके, थँक्यू’ असे इंग्रजीत सांगणे त्यांना शक्य होत असून बहुतांशी संभाषणाचे ते आकलन करू शकत आहेत. दररोज वर्गामध्ये आल्यानंतर यापूर्वी झालेल्या अध्यायाची उजळणी करणे, नवीन अभ्यास करणे तसेच त्याचा सराव करणे हा नित्याचा भाग असून आगामी काळात त्यांना इंग्रजी लिखाणाचे धडे देण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे व्यंकट यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पालघरमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत; भातशेतीवर कीटकांचा प्रादुर्भाव

बचत गटाला आत्मनिर्भर करण्याच्या या प्रयासांमध्ये ग्रामीण भागातील अल्पशिक्षित महिलांना एक पाऊल पुढे नेण्याच्या दृष्टीने हा अभिनव प्रयोग कार्यरत आहे. वेंकट अय्यर यांनी सेंद्रिय शेती सुरू केल्यानंतर आपल्या अनुभवांचे कथन “मूग ओवर मायक्रोचीप” या इंग्रजी पुस्तकात कथन केले. या पुस्तकाचा नंतर “कॉर्पोरेट ला राम राम आणि शेतीला सलाम” असे मराठी मध्ये अनुवाद झाले.

बचत गटाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या अनुषंगाने त्यांना स्वयंपूर्ण होणे आवश्यक होते. इंग्रजी शिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणी शिक्षक उपलब्ध परस्पर संवादी अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून त्यांना इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात या महिला आपल्या कार्यात एक पाऊल पुढे जातील असा विश्वास वाटत आहे. – वेंकट अय्यर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवानिवृत्त व्यवस्थापक, नैसर्गिक शेती शेतकरी (पेठ)