पालघर जिल्ह्यात आदिवासींचा आनंदोत्सव

पालघर: हजारोंच्या संख्येने तारपाच्या तालावर थिरकत ‘जय जोहार’ ही घोषणा संपूर्ण पालघर शहरात दुमदुमली. आदिवासींची परंपरा, संस्कृती व ऐक्याचे दर्शन आदिवासी दिनानिमित्त पालघरकरांना सोमवारी अनुभवयाला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिपाणी, तारपा, ढोल, टिपरी, घुंगरू काठीच्या तालावर पालघर जिल्ह्यातील हजारो आदिवासींनी एकत्रित येत आदिवासी महोत्सव जल्लोषात साजरा केला. पालघरमध्ये भव्य मिरवणूक काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. तरुणांचा व महिलांचा यात मोठा सहभाग होता. करोनाचे दु:ख बाजूला सारत हजारोंच्या संख्येने एकत्रित येत आदिवासी दिनाच्या शुभेच्छांचा वर्षांव पालघरमध्ये पाहावयास मिळाला. जय जोहार म्हणत आदिवासी बांधवानी एकमेकांना या विशेष दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

काखेत पोरं अन हातात खराटा ही ओळख आदिवासी संस्कृतीची आहे असे सर्वत्र भासवले जाते. मात्र आदिवासी संस्कृती, रीती, चाली, परंपरा ही एक जगायची जीवनशैली आहे. ती टिकावी यासाठी आदिवासी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते काळूराम धोडदे यांनी पालघर येथे केले. पालघर चार रस्ता येथून मिरवणूक सुरुवात केली गेली तिथुन पालघर स्थानक मार्गे कचेरी रोड ते आर्यन शाळा रस्तापर्यंत भव्य मिरवणूक काढली गेली. पालघर जिल्ह्यत औद्योगिक कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, वाढवण बंदर, फ्रेट कॉरिडॉर असे प्रकल्प लादून येथील आदिवासींचे अस्तित्व नष्ट करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. ही जल, जंगल, जमीन आमची आहे, आमच्या जमिनींवर आमचा अधिकार आहे. आमच्या जमिनी हिसकवण्याचा प्रयत्न केला तर मोदी सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ, त्यासाठी सर्वानी एकत्रित येत लढा दिला पाहिजे असे आवाहन धोदडे यांनी केले.

करोना काळजीचे सर्व संकेत पायदळी

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यच्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना करोना पार्श्वभूमीवर त्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय व उपाययोजना आखणे गरजेचे होते. पालघर शहरामध्ये आयोजित भव्य रॅली मध्ये किमान सहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाल्याचे दिसून येत असून संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नेमून दिलेले संकेत व नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले.