पालघर: वाढवण बंदराच्या जन सुनावणीच्या बंदोबस्तासाठी पालघर कडे येताना मोखाडा घाटात जळगाव पोलीस यांची गाडी उलटली असून चार अंमलदार जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९ जानेवारी (उद्या) पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात पर्यावरण विषयी पर्यावरणीय जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावलीला बंदरामुळे बाधित होणाऱ्या ३० गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता असून त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

हेही वाचा >>>लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी विकास? नगरपरिषद विकासक धार्जिन्ये धोरण राबवित असल्याचे सदस्यांचा आरोप

या जन सुनावणीसाठी सुमारे १५०० पोलीस कर्मचारी अधिकारी व १० विशेष पथक तैनात ठेवण्यात येणार असून त्यापैकी सुमारे ८०० पोलीस अधिकारी, कर्मचारी पालघर जिल्ह्याच्या बाहेरून येणार असल्याची माहिती देण्यात आली. या जन सुनावणीच्या बंदोबस्तासाठी जळगाव येथून पोलीस पथक येत असताना पहाटे पाच वाजले च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon police van overturned at mokhada ghat and four officers were injured amy