पालघर : मुंबई महानगर क्षेत्रातील झपाटय़ाने नागरीकरण होत असलेली वसई, विरार ही शहरे आणि पर्यटनासाठी अधिकाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या इतिहास आणि वर्तमानातील जडणघडणीचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘हिरवं सोनं’ या कॉफी टेबल पुस्तकाचे आज, गुरुवारी प्रकाशन होणार आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने ‘वेगळय़ा वाटेचे वारकरी’ या विशेष गप्पासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रयोगशील शेतकरी कृषिभूषण रामचंद्र सावे, वारली चित्रकार मधुकर वाडू, गिर्यारोहक हर्षांली वर्तक, अभिनेत्री हर्षदा बामणे हे सहभागी होतील. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.  सुमारे आठ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्याची अल्पावधीतच वैशिष्टय़पूर्ण ओळख बनली आहे. घोलवडचे चिकू, वाडा कोलम तांदूळ, विडय़ाची पाने अशा कृषी उत्पादनांसाठी हा जिल्हा जगभर ओळखला जाऊ लागला आहे. या जिल्ह्यातील पर्यटनस्थळे जगभरातील पर्यटकांना खुणावतात. तारापूर, बोईसर, वसई शहरांतील औद्योगिक क्षेत्रांतून जगभरात उत्पादने निर्यात केली जात आहेत. शिवाय वसई, विरार यासारख्या शहरांतील परवडण्याजोगी आणि आकर्षक घरे सर्वसामान्यांना घराच्या स्वप्नपूर्तीचे समाधान देत आहेत. अशा या सर्वागाने समृद्ध जिल्ह्याच्या आजवरच्या वाटचालीचा वेध ‘हिरवं सोनं’ या कॉफी टेबल पुस्तकातून घेण्यात आला आहे.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक

* विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, विरार

सहप्रायोजक

* वसई-विरार शहर महानगरपालिका

* केसरी टूर्स

पॉवर्ड बाय

* यशवंत स्मार्ट सिटी

* सुरक्षा स्मार्ट सिटी

* तारापूर इंडस्ट्रियल  मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन