पालघर जिल्ह्यातील घोलवडपासून विरार-वसईपर्यंतचे लाखो नागरिक आपल्या रोजीरोटीसाठी मुंबईला दररोज प्रवास करत असतात. तसेच गुजरातमधील औद्योगिक आस्थापनांमध्ये तसेच प्रासंगिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील लक्षणीय आहे. नागरिकांसाठी रेल्वे ही लाईफलाईन असली तरीही उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांचे हाल कायम राहिले आहेत. लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना व माध्यमांद्वारे या समस्यांना वारंवार वाचा फोडण्यात येत असली तरीही पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी अनेक वर्षे उपेक्षित राहिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईतील कुटुंबे प्रथम भाईंदर, वसई, विरार येथे स्थलांतरित झाल्यानंतर नागरीकरणाचा ओघ पुढे सफाळा, पालघर, उमरोळी, बोईसर असा वाढत राहिला आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांमध्येही वाढ होत राहिली. तरीदेखील गाड्यांच्या संख्येत विशेष वाढ झाल्याचे दिसून आले नाही. रेल्वे रुळांची गाड्या वाहून नेण्याची क्षमता पूर्णत्वास आली असल्याचे कारण रेल्वे प्रशासन पुढे करत असले तरीही प्रत्येक वेळापत्रकात सुपरफास्ट व विशेष गाड्यांची वाढ होताना दिसते. त्यापलीकडे मालगाड्यांची संख्या गेल्या काही वर्षांत काही पटींनी वाढली असताना उपनगरीय फेऱ्या वाढवण्यासाठी देखील वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी व मर्यादा यांचा रेल्वे प्रशासन आसरा घेत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा >>>पालघर : वलसाड फास्ट पॅसेंजरचे दैनंदिन प्रवासी हवालदिल, जागा पकडण्यासाठी घोलवड पर्यंत धाव

वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीचे डबल डेकर डब्यांचे आयुर्मान संपत असल्याने रविवार, ५ जानेवारीपासून सिंगल डेकर डब्यांच्या मदतीने या गाडीला रूपांतरित करण्यात आले. मुळात डब्यांचे आयुर्मान २०२४ मध्ये संपत असल्याचे प्रवासी संघटनेने २०१७ मध्ये निदर्शनास आणून देऊन त्या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या दूरदृष्टीचा अभाव तसेच हॉलिडे स्पेशल किंवा तत्सम गाड्यांचे थांबे मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्याची प्रवृत्ती अंगीकृत असल्याने या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष अथवा पाठपुरावा झाला नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवाय डबल डेकर डबे बदलताना प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन डब्यांमध्ये वाढ करणे अथवा पर्याय उभे करण्यास लोकप्रतिनिधींनी केलेले प्रयत्न तोकडे पडले, असे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.

हेही वाचा >>>अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी

डहाणू रोडपर्यंत उपनगरीय क्षेत्र १९९५ साली घोषित झाले असले तरीही प्रत्यक्षात उपनगरीय सेवा १ एप्रिल २०१३ रोजी सुरू झाली. त्यानंतर या भागातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील आरक्षित डब्यांमधून प्रवास करण्याची मुभा बंद करण्यात येऊन अनेकदा दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुरेशा प्रमाणात उपनगरीय सेवा उपलब्ध नसताना प्रथम फ्लाइंग राणी सुपरफास्ट एक्स्प्रेस व वलसाड फास्ट पॅसेंजर या गाड्यांचे डबल डेकर डबे काढून गाड्यांची आसन क्षमता कमी करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना तसेच रेल्वेच्या विविध समितींचे सदस्य वारंवार अपयशी ठरल्याचे दिसून आले.

उपनगरीय सेवा बोईसरपूर्वीच भरल्या जात असून बोईसर किंवा पालघरपासून नवीन सेवा सुरू करणे, विरारला तासनतास उभ्या राहणाऱ्या लोकल गाड्या बोरिवली, अंधेरी व दादरपर्यंत विस्तारित करणेदेखील पश्चिम रेल्वेला आजवर शक्य झालेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये असणारा असंतोष दिवसेंदिवस वाढत असून त्याचा उद्रेक कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रत्यक्षात कृती करण्याची गरज

पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील असले तरीही प्रवाशांची प्राथमिक मागणी ही सातत्यपूर्ण उपनगरीय सेवा ही आहे. त्याकडे दुर्लक्ष करताना अथवा लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे वाढवण्यास येणाऱ्या अपयशाबद्दल आजी-माजी खासदार मूग गिळून बसले आहेत. प्रश्न मांडण्यासाठी निवेदन देऊन श्रेय घेऊ पाहणारे लोकप्रतिनिधी यांना आता प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे, असे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जाऊ लागले आहे.

आम्ही बसायचे कुठे?

डबल डेकर डब्यांमध्ये वर आणि खाली दररोज प्रवास करणाऱ्या मंडळींचे ठिकाण जवळपास ठरलेले असायचे. या डबल डेकर डब्यांऐवजी सिंगल डेकर डबे आल्याने वर्षानुवर्षे एकाच डब्यात प्रवास करणाऱ्या मंडळींचे नियोजन कसे करावे हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार आहे. मंथली सीजन टिकीट अर्थात पासधारक (एमएसटी) यांच्यासाठी यापूर्वी असणाऱ्या ११ सर्वसाधारण डबल डेकर डब्यांच्या तुलनेत मिळालेले १३ सिंगल डेकर डबे यांची क्षमता कमी असल्याने आम्ही कसे व कुठल्या डब्यातून प्रवास करावा हा प्रश्न उफाळून आल्याचे दिसून आले आहे.