पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार रॅलीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होत असून सातपाटी व मुरबे येथे रॅलीच्या दरम्यान निषेधाचा सूर उमटल्याचे दिसून आले. केंद्र सरकारने वाढवण आणि मुरबे या भागात प्रस्तावित बंदर उभारणी प्रकल्पाला गती दिली असून याविरोधात पश्चिम किनारपट्टीवरील गावकरी आक्रमक झाले आहेत. मुरबे येथे प्रस्तावित बंदराच्या विरोधात ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवले तर ग्रामपंचायतीच्या वतीने बंदराच्या विरोधात निवेदन देण्यात आले.

स्थानिकांनी यापूर्वी वाढवण व मुरबे येथील प्रस्तावित बंदराच्या विरोधात राजेंद्र गावित यांची मुरबे गावात प्रचार रॅली सुरू असताना ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवत प्रचार रॅली रोखली. यावेळी राजेंद्र गावित यांनी खासदार असताना या प्रकल्पात विरोधात ठोस भूमिका घेतली नाही म्हणून गावित यांच्यासह महायुतीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. ग्रामपंचायतच्या सरपंच मोनालिसा तरे, उपसरपंच राकेश तरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी मुरबे बंदराला विरोध करणारे निवेदन राजेंद्र गावित यांना सादर केले. राजेंद्र गावित निवडून आल्यास त्यांनी बंदराच्या विरोधात ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सोबत उभे राहावे अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली.

BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
assembly elections 2024 Sc reservation Subclassification Grand Alliance Mahavikas Aghadi voting  print politics news
अनुसूचित जातीच्या मतांचे ध्रुवीकरण? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा फटका
Uddhav Thackeray campaign aggressively against 40 rebel MLAs and hold meetings in Bhiwandi Rural
फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा
Uddhav Thackeray Aditya Thackeray (1)
Maharashtra Elections : “वरळी-वांद्र्यात मदत मिळावी यासाठी भिवंडीवर अन्याय”, माजी आमदाराची उद्धव ठाकरेंवर टीका
sharad pawar ajit pawar (4)
“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
Devendra Fadnavis, Nagpur Devagiri, Nagpur,
नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न

हेही वाचा >>> पालघर : विक्रमगड विधानसभेतील शिवसेना बंडखोरीमुळे पालघरमधील महायुतीत वादाची ठिणगी

राजेंद्र गावित यांनी खासदार होण्यापूर्वी बंदर प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली होती तसेच बंदराचे काम सुरू झाल्यास आपण बुलडोझर समोर झोपू असे जाहीर घोषणा केली होती. मात्र महायुतीकडून निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर तसेच खासदारकीच्या कारकीर्दीत गावित यांनी या प्रकल्पांविषयी मौन पाळल्याने सध्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी गावोगावी भेट देत असताना बंदर विरोधी घटकांकडून गावित त्यांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत.

हेही वाचा >>> बहुजन विकास आघाडीला अखेर शिट्टी चिन्ह मिळाले, उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

मुरबे येथे आज दुपारी प्रचार रॅली दरम्यान हातात काळे झेंडे घेऊन ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. गावित यांना अशा प्रकारच्या विरोधाचा सामना सातपाटी गावात देखील यापूर्वी करावा लागला असून पश्चिम किनारपट्टीवरील अनेक गावांमध्ये बंदर उभारणीला विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संदर्भात राजेंद्र गावित यांचे प्रतिनिधी व शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रवक्ते केदार काळे यांच्याशी संपर्क साधला असता विरोधकांनी जाणीवपूर्वक निषेध केल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील अशा प्रकारे बंदर विरोधी घटकांकडून निषेध व विरोध केल्यानंतर देखील महायुतीच्या उमेदवाराला किनारपट्टीच्या भागात भरघोस आघाडी मिळाल्याचे त्यांनी लक्ष वेधले. या संदर्भात महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी मुरबे ग्रामस्थांशी चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट केल्याचे केदार काळे यांनी लोकसत्ताला सांगितले.