पालघर : पालघर जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महत्त्वाच्या तसेच राज्यातील मोठय़ा प्रकल्पांचे काम सुरू आहे. या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे जिल्ह्यातील स्थानिक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. नुकसान झालेल्या ठिकाणांची परिस्थिती पूर्ववत करून द्यावी किंवा दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेला निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालघर जिल्ह्यामध्ये समर्पित मालवाहू द्रुतगती मार्ग (डीएफसीसी), मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग तसेच पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून याकामी गौण खनिज व लोखंड-स्टील वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे अनेक जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शिवाय या तिन्ही प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात माती भराव टाकला जात असल्याने मुरुम-मातीच्या वाहतुकीमुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण होऊन काही ठिकाणी मोऱ्या व पुलांची स्थिती कमकुवत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीने अनेकदा प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांकडे पाचारण केल्यानंतरदेखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने यंदाच्या पावसाळय़ात अनेक ठिकाणी रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण झाले होते.
हेही वाचा >>> अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा
या प्रकल्पांसोबत मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी एमएमआरतर्फे मोठय़ा आकाराच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी या पाइपलाइन टाकताना अस्तित्वात असणारे रस्ते फोडण्यात आले आहेत. या फोडलेल्या भागात मुरुम-माती टाकून कच्च्या पद्धतीने त्यामुळे दळणवळणास त्रासदायक ठरत आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पांच्या दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची मोडतोड झाली असून त्याच्या दुरुस्तीसाठीदेखील मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता भासत आहे.
अशा रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने तरतूद केली नसल्याने आगामी काळात हे रस्ते दुरुस्त होणे कठीण झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने प्रकल्प संचालकांना अनेकदा पत्र व स्मरणपत्र दिले असले तरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही. जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची झालेली बिकट अवस्था पूर्ववत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी केली आहे.
हेही वाचा >>> “वेडात मराठे वीर दौडले चाळीस”; राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मिश्कील टिप्पणी
डहाणू, पालघर तालुक्यांना सर्वाधिक फटका
कासा/पालघर: डहाणू व पालघर तालुक्यात सद्यस्थितीत मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉर, मुंबई बडोदा एक्सप्रेस वे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण असे मोठे प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पाच्या कामासाठी लागणारी खडी, दगड, मुरूम हा वाडा, बोईसर इतक्या दूरवरून आणला जातो. मर्यादेपेक्षा जास्त वजन वाहनांमध्ये भरले जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या परिसरातील रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. पालघर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या प्रकल्पासाठी अवजड वाहनांनमधून अवास्तव गौण खनिजाच्या अनेक फेऱ्या अवजड वाहने करीत आहेत. या अवजड वाहनांच्या वजनांमुळे रस्ते खराब होत आहेत तसेच गौण खनिज रस्त्यावर पडून रस्ते चिखलमय व निसरडे बनत असल्याने अनेक अपघात घडल्याचा घटना घडल्या आहेत. माकुणसार, मायकोप,बंदाथे,मासवण भागात बहाडोली, पूर्व परिसर अशा ठिकाणी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे पाहायला मिळते. समर्पित मालवाहू प्रकल्पामुळे रेल्वे नजीकच्या शेतजमिनीचे जाणारे रस्तेही या प्रकल्पामुळे बाधित झालेले आहेत.