पालघर रेल्वे स्थानकामध्ये असणाऱ्या तिकीट घरात (सेंट्रल बुकिंग ऑफिस) मध्ये सुरू असलेल्या कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यासाठी नेमलेल्या महिला अधिकाऱ्याऐवजी चक्क त्यांच्या पतीने हे काम करण्याची घटना पालघर मध्ये घडली. याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर वरिष्ठांनी पालघर स्टेशन व्यवस्थापकांना तोतया कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सूचना केल्या. मात्र रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर सहा तास उलटल्यानंतर देखील रेल्वे पोलीस अथवा रेल्वे सुरक्षा दलात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा >>> वारली कलेतून नैसर्गिक शेतीचे धडे, वायेडा बंधूंच्या तिसऱ्या पुस्तकाचे जर्मनीत प्रकाशन

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

पालघर रेल्वे स्थानकात असलेल्या सेंट्रल बुकिंग कार्यालयात सकाळी नऊ वाजता आपण ऑडिटर (लेखापरीक्षण करणारे अधिकारी) असल्याचे सांगत एका इसमाने प्रवेश घेतला. त्यांनी या कार्यालयातील सर्व कागदपत्रांची झाडझडती घेतली. त्यांच्या एकंदर वर्तुणुकीवरून संशय आल्याने पालघर येथे स्थित वाणिज्य निरीक्षकांनी याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली. त्यानंतर लेखापरीक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती महिला असून त्याच्या ऐवजी तिचे पती काम करत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा >>> पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची सेवा विस्कळीत

यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पालघरच्या स्टेशन व्यवस्थापकाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही घटना समजल्यानंतर संबंधित महिला अधिकारी यांनी पालघर रेल्वे स्थानक गाठून हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. पालघरच्या आरपीएफ कार्यालयामध्ये या तोतया कर्मचाऱ्याला ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित करून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र रेल्वे पोलीस जीआरपी यांनी आपल्याकडे सदरचा इसम व तक्रार देण्यासाठी कोणीही आले नाही असे सांगितले, यामुळे या प्रकरणात सहा तास उलटल्यानंतर देखील कोणतीही फिर्याद नोंदवण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. संबंधिताविरुद्ध फिर्याद दाखल झाल्यानंतर तपशील जारी केला जाईल असे रेल्वे पोलिसांनी लोकसत्तेला सांगितले.