कासा : गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. डहाणू बसस्थानक तसेच डहाणू बस आगारात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. बस आगारात पाणी घुसत असल्याने अनेक बस आगारातून दुसरीकडे हलविण्यात आल्या. बसस्थानकातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने काल संध्याकाळी डहाणू वरून जव्हार, ठाणे, उद्धवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस अचानक रद्द करण्यात आल्या. बस रद्द झाल्याने बसची वाट पाहत बसलेल्या अनेक प्रवाशांचे हाल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच हवामान खात्याने पुढील तीन चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काल दिनांक १३ जुलै रोजी दुपारनंतरसुद्धा वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. डहाणू शहरातसुद्धा मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. डहाणू बसस्थानक आणि आगारातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाऊस सुरूच असल्याने व पाणी वाढत असल्याने बस आगारात उभ्या असलेल्या अनेक बस सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या. बसस्थानकातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डहाणू येथून दुपारनंतर जाणाऱ्या अनेक बस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बसने प्रवास करणारे अनेक प्रवासी व विद्यार्थी यांचे हाल झाले. जोरदार पाऊस पडत असल्याने खाजगी वाहने मिळणेसुद्धा अवघड झाले होते. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मिळेल त्या साधनाने प्रवास करत घर गाठावे लागले. बस स्थानकात पाणी साचले असले तरी सागर नाका येथून तरी बस सोडाव्यात अशी मागणी प्रवाशी करत होते. परंतु आगारातील बस दुसरीकडे हलविण्यात आल्याने बस सोडता आल्या नाही.

हेही वाचा – शहरबात : उशिरा सुचलेले…

हेही वाचा – तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मध्ये वायुगळती, शिवाजीनगर परिसरात नागरिकांना चक्कर येण्याचे प्रकार

पावसाचा अहवाल, पालघर जिल्हा

कालावधी १३/०७ (८:३० सकाळ) ते १४/०७(८:३० सकाळपर्यंत)

स्रोत – संकेतस्थळ, कृषि विभाग, महाराष्ट्र

तालुका – आजचा पाऊस

वसई – १२५.९
वाडा – १७४.६
डहाणू – १०१.१
पालघर – ८०.८
जव्हार – ३७.०
मोखाडा – ४९.२
तलासरी – ७४.१
विक्रमगड – १२९.१

सरासरी पाऊस, पालघर जिल्हा = १०४.२ मिमी

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many buses were canceled due to water entering dahanu bus station and agar due to heavy rain ssb
Show comments