वाडा, वसई, भिवंडी, शहापूर, विक्रमगड परिसरातील ग्राहकांची गैरसोय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाडा : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध बाबतीत र्निबध लागू केले आहेत. या कडक र्निबधाचा फटका कुडूस येथे पावसाळ्यापूर्वी भरविण्यात येणाऱ्या वार्षिक बाजाराला बसला आहे. गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही हा बाजार बंद ठेवण्यात आल्याने कुडूस परिसरातील ५२ गावांतील शेतकरी व गोरगरीब जनतेची मोठी गैरसोय झाली आहे.

कुडूस येथे गेल्या १०० वर्षांपासून दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असे सलग २५ ते २७ दिवस हा वार्षिक बाजार भरत असतो. मात्र गत वर्षीप्रमाणे यावर्षीही करोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने यावर्षीही हा वार्षिक बाजार बंद ठेवावा लागला आहे. यामुळे या बाजाराची १०० वर्षांची जुनी परंपरा पुन्हा एकदा खंडित झाली आहे.

या वार्षिक बाजारात सर्व प्रकारचे किराणा सामान तसेच वर्षभर ठेवणीसाठी लागणारे कांदे, लसून, मसाले, खोबरे आदी वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर उलाढाल होत होती. वाडा तालुक्यासह शेजारील वसई, भिवंडी, शहापूर, विक्रमगड या तालुक्यातील ग्राहक या बाजारात येऊन वर्षांकाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या सामानाची खरेदी करीत असत.

विशेषत: कुडूस ही आजूबाजूच्या परिसरातील ५२ गावांची मुख्य बाजारपेठ आहे. या गावातील शेतकरी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदीसाठी या बाजारात येत होते. तसेच सर्वसामान्य ग्राहक आपल्या वर्षभराचे किराणा सामान याच बाजारातून खरेदी करीत असत. अन्य ठिकाणापेक्षा या बाजारात खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत १० ते १५ टक्के कमी दराने विक्री होत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी येथे होत असे.

नाशिक, इगतपुरी, घोटी, सिन्नर, राजूर, संगमनेर येथील व्यापारी मसाल्यांचे पदार्थ, कांदा, लसून, बटाटा, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तंबाखू  विकण्यासाठी घेऊन येत होते. स्थानिक बाजारपेठेपेक्षा कमी दराने वस्तू या बाजारात मिळत असल्याने या बाजाराला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीच्या आजारामुळे येथील भरणारा वाषिॅक बाजार बंद झाल्याने व्यापाऱ्यांबरोबर येथील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा वार्षिक बाजार खंडित झाल्याने कुडूस ग्रामपंचायतीला कराच्या रूपाने मिळणारे ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न कमी झाले.

अनिरुद्ध पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कुडूस. ता. वाडा