लोकसत्ता वार्ताहर

बोईसर : बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थीनींवर झालेल्या अमानुष शारीरिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यातील तारापूर मध्ये देखील एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती आणि शारीरिक लगट करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पालघर चे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
palghar food poison death marathi news
एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती स्थिर; अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय
railway employees suspended boisar marathi news
बोईसर: विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली; रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
women beneficiaries in ladki bahin scheme
‘लाडक्या बहिणीं’ची संवेदनशील माहिती ‘व्हायरल’
earthquake dahanu marathi news
पालघर: डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
maharashtra government not give concession to wine from fruits other than grapes
द्राक्षांव्यतिरिक्त अन्य फळांचे वाइन उद्योग मरणपंथाला

तारापूर पोलीस स्टेशन हद्दीत कुटुंबियासमवेत राहणारी बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय इसमाने शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जबरदस्तीने घरात प्रवेश करीत मुलीचा विनयभंग करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा. संध्याकाळी मुलीचे आई वडील घरी आल्यानंतर मुलीने त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल सांगितल्यावर पालकांनी तातडीने तारापूर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

आणखी वाचा-एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती स्थिर; अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय

तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत बालकांचे लैंगिक शोषण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करीत शनिवारी रात्री अटक केली आहे. रविवारी सकाळी आरोपीला पालघर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.