मोखाड्यात एका जंगली माकडाने गेली १५ दिवसांपासून ऊच्छाद मांडला होता. या माकडाला पकडण्यास वनविभागाला अखेर यश आले आहे.या माकडाने नागरीकांवर हल्ला करुन त्यांना जखमी करत होते. त्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले होते. त्यामुळे मोखाडा भागात त्याची दहशत निर्माण झाली होती. त्याला वनविभागाचे कर्मचारी यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा त्यांना हुलकावणी देत ते माकड पसार होत होते. अखेर मंगळवारी (ता ८) मोखाडा पेट्रोल पंपाजवळील हाॅटेलानजिक जाळीत अडकून या माकडाला जेरबंद करण्यात आहे. त्यामुळे येथील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवारपाडा ते जव्हार फाटा दरम्यान एक मोठे माकड (लाल तोंडाचे) फिरत होते हे कदाचित जंगलातून रस्ता चुकल्याने भरकटले. मात्र हे माकड बाकी माकडाप्रमाणे नसून थेट नागरिकांवर हल्ला करून चावत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. वनविभागाच्या वाहन चालकाला सुद्धा हे माकड चावले होते. याभागातील अनेक लहान मुले, तरुण यांना सुद्धा याने चावा घेतलेला होता. यामुळे याभागात दहशत निर्माण झाली होते.
हे माकड रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यावर अचानकपणे हल्ला करून चावा घेत असल्याने नागरिक घाबरून गेले होते.मोखाड्यात जंगली माकडाच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झालेत. या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्यानी शर्तीचे प्रयत्न केले मात्र, ते त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होते. आपल्या टप्प्यात असलेल्या दिसेल त्या नागरिकावर हे माकड हल्ला करत होते. त्यामुळे मोखाड्यातील पवारपाडा ते जव्हार फाट्या दरम्यान या माकडाची दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने जाळी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते त्यांच्या तावडीतून पसार झाले होते.
या माकडाने वनविभागाच्या कर्मचार्याची डोकेदुखी वाढवली होती. अखेर मंगळवारी सकाळी हे माकड पवारपाडा नजिकच्या पेट्रोल पंपाजवळील हाॅटेल जवळ येताच, वनविभागाच्या कर्मचार्यानी जाळ्यात अडकवुन या माकडाला जेरबंद करुन पिंजर्यात डांबले आहे. त्यामुळे दहशती खाली वावरणार्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या माकडाला आता त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिली आहे.