कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू कंटेनरला प्रवासी बसची धडक बसून भीषण अपघात झाला आहे. अपघातात प्रवासी बसमधील चार जण जखमी झाले आहेत. कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाल्यामुळे अपघाताचे नेमके कारण  स्पष्ट झालेले नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास तवा येथील पुलावर मुंबईकडून गुजरातकडे निघालेल्या मालवाहू कंटेनरचालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या प्रवासी बसने कंटेनरला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार बसचालक मुस्ताक सिंधी, वाहक असिफ मन्सुरी, प्रवासी प्रल्हाद चव्हाण आणि सोमा फुलानी जखमी झाले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.