नीरज राऊत

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा काही निवडक ठिकाणे वगळता सहा पदरी झाला असल्याने गाडय़ांचा वेग वाढला आहे. परिणामी या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत. त्यात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर उपचारांची व्यवस्था व कार्यपद्धती नसल्याने प्रसंगी रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. या महामार्गावरील पथकर वसुली होत असली तरी वैद्यकीय सोयीसुविधा जवळपास नसल्यात जमा आहेत.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज
cm Eknath Shindes promise to make Mumbais roads pothole free in two years vanished
शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण, ‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच
Accidents increase Maharashtra ranking third in road accident victims
रस्ते अपघातांतील बळींमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

खाजगी व प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, रासायनिक वाहतूक व इतर वाहनांची वर्दळ असणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर दहिसर ते तलासरी दरम्यानच्या राज्यातील पट्टय़ामध्ये नियमितपणे अपघात होत असतात. वसई-विरार परिसरापर्यंत अपघात घडल्यास त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयांची उपलब्धता असल्याने त्या ठिकाणी उपचार मिळण्याची व्यवस्था आहे. शिवाय रुग्ण गंभीर असल्यास त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईकडे पाठवण्यात येते.

वसई तालुक्याच्या तुलनेत पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यात अपघात घडण्याची संख्या अधिक असून या ठिकाणी वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे काम अजूनही प्रलंबित राहिले आहे. राष्ट्रीय महामार्गावर मनोर टाकवहाळ येथे २२० खाटांचे ट्रॉमा सेंटर उभारण्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून या रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता व कामाची पूर्तता होण्यास किमान आठ- नऊ महिन्यांचा अवधी लागणे अपेक्षित आहे. पालघर नंडोरे येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या कामाला नवीन वर्षांत आरंभ होऊन रुग्णालयाच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे.

कासा येथे असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ट्रॉमा केअर सेंटर म्हणून संबोधित केले होते. मात्र त्या ठिकाणी गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ, सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने टोलवसुलीच्या ठेक्यातील अटी-शर्तीची पूर्तता करण्यापुरता कागदोपत्री केंद्र अशी त्या ठिकाणी अवस्था आहे.

पालघर व डहाणू तालुक्यातील महामार्गाच्या पट्टय़ात अपघात झाल्यास गंभीर रुग्णांना गुजरात राज्यातील वापी, वलसाड, केंद्रशासित प्रदेशातील सेलवास, दमण येथे हलविणे भाग पडते. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला झालेल्या अपघातप्रसंगी गंभीर असणाऱ्या पंडोल कुटुंबीयांतील जखमींना अशाच पद्धतीने वैद्यकीय व्यवस्थापन करण्यात आले होते. मात्र अपघातामध्ये हाडांशी संबंधी (ऑर्थोपेडिक) किंवा मज्जातंतू (न्यूरोलॉजी) संदर्भात गुंतागुंत असल्यास अशा रुग्णांना गुजरात व केंद्रशासित प्रदेशातील जवळच्या ठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना सुरत किंवा अन्य ठिकाणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचारार्थ दाखल करणे गरजेचे भासत असून एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्ण स्थलांतरित वाया जाणारा किमती वेळ रुग्णांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतो. शिवाय गुजरात व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांना पूर्वीइतके आदरातिथ्य मिळत नसल्याचे सांगण्यात येते. तसेच या सर्व ठिकाणी गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास रक्तदान करण्यासाठी व्यक्तीला सोबत न्यावे लागते अशी स्थिती आहे.

एकंदर परिस्थिती पाहता अपघातामध्ये गंभीर असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची सक्षम व्यवस्था नसल्याने जो पर्यंत नवीन ट्रॉमा केअर रुग्णालय पूर्ण क्षमतेने व मनुष्यबळाच्या ताकदीने कार्यरत होत नाही तोपर्यंत सोमटा ते चारोटी दरम्यान हंगामी मिनी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची गरज भासत आहे. सोमटा येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ किंवा दहा खाटांच्या रुग्णालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनुष्यबळाच्या जोडीला जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे असणाऱ्या तज्ज्ञांची जोड देणे शक्य आहे. त्याचबरोबर डहाणू परिसरात असणाऱ्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील सोयीसुविधा व मनुष्यबळाच्या मदतीने गंभीर रुग्णांना स्थिर करण्यासाठी अशा केंद्राची मदत होऊन अनेक गंभीर रुग्णांची होणारी फरफट थांबू शकेल व त्यांचे प्राण वाचू शकतील. अशी व्यवस्था उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी यांचा पुढाकार आवश्यक आहे. टोल वसुली करणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाच्या टोल वसुली ठेकेदारामार्फत अशी व्यवस्था कार्यरत ठेवण्यासाठी औषध व निधीची उपलब्धता करून देणे शक्य असून जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे.

धक्का शोषक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला अपघात झालेल्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषण करणारी यंत्रणा कार्यरत असली तरीही अलीकडच्या काळात एअरबॅग असणाऱ्या वाहनांना अपघात घडल्यास कोणती यंत्रणा अधिक प्रभावी राहील याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना अनेकदा वाहनातील प्रवासी सीट बेल्ट घालत नसल्याने अपघाताच्या धक्क्याने वाहनातील आसनांना किंवा वाहनाच्या बाजूला आपटून गंभीर जखमी होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र आसनपट्टा घातले असल्यास अनेकदा एअर बॅग उघडली जात असल्याने धक्का शोषण यंत्रणेमुळे त्या ठिकाणी अपघात घडल्यास एअर बॅग उघडतील किंवा नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Story img Loader