पालघर : मुंबई -वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीचे आयुष्यमान संपत आल्याने तिचा प्रवास लवकरच संपुष्टात येणार आहे. यामुळे विरार-वैतरणा दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या सात ते आठ हजार प्रवाशांच्या सुरू असलेल्या हालात आणखी भर पडणार आहे.

मुंबई -वलसाड फास्ट पॅसेंजर ही गाडी १८ डब्ब्यांची आहे. त्यात ११ डबलडेकरचे डबे आहेत. सर्वसाधारणपणे १३६ आसन क्षमता असणाऱ्या एका डब्यामधून २५० ते ३०० प्रवासी सहज प्रवास करत असतात. सुमारे १० हजार दैनंदिन प्रवासी संख्या असलेली ही डबलडेकर गाडी नोकरदारवर्ग, विद्याार्थी, व्यावसायिक, व्यापारी आदींसाठी लाभदायक आहे. सकाळी वलसाड आणि संध्याकाळी मुंबई सेंट्रलवरून सुटते. सुमारे २० स्थानके असलेली ही गाडी पूर्वीच्या काळी १३ अप/१४ डाऊन व नंतर ०९०२३ अप/०९०२४ डाऊन म्हणून ओळखली जाते. या गाडीचा १३ जुलै १९९३ पासूनचा प्रवास मुंबई सेंट्रल ते वलसाड दरम्यान मर्यादित करण्यात आला आहे. ही गाडी मुंबई येथे दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या अप-डाऊन पासधारकांसाठी अत्यंत सोयीची असल्याने उंबरगावपासून वैतरणा-विरारपर्यंतचे हजारो प्रवासी या गाडीचा प्रामुख्याने वापर करीत आहेत. त्यामुळे या भागातील दैनंदिन प्रवाशांसाठी ती जीवनवाहिनी ठरली आहे.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ratnagiri Lohmarg Police Station begin operations at Ratnagiri Railway Station on Republic Day
प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वेवर लोहमार्ग पोलीस ठाणे उभे राहणार, रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात १४० पोलिसांचा ताफा
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था

आणखी वाचा-Uddhav Thackeray : ‘काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला’ विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्लं…”

या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्याशी संपर्क साधला असता नवीन सिंगल डेकर डब्यानी ही गाडी लवकरच धावेल असे सांगून जुन्या डबल डेकर डब्यांची व्यवहार्यता पाहून या डब्याला ‘रेस्टॉरंट ओन विल्स’ मध्ये परिवर्तन करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. वलसाड फास्ट पॅसेंजर मधील डब्यांमधील रचनेत बदल करताना त्यामधील प्रवाशांची संख्या विचाराधीन घेतली जाईल असेही त्यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

फ्लाईंग राणीचे डबे वलसाड फास्ट पॅसेंजरला?

काही महिन्यांपूर्वी फ्लाईंग राणी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचे डबलडेकर डबे बदलून त्या ठिकाणी एलएचबी डबे बसवण्यात आले होते. दरम्यान फ्लाईंगचे डबल डेकर डबे गुजरात राज्यात सेवेत असल्याचे आरोप उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांकडून केले जात आहेत. या आरोपाचे रेल्वे प्रशासनाने खंडन केले आहे. दरम्यान २५ डिसेंबरपासून वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबे बदलून त्या ऐवजी सध्या फ्लाईंग राणी सुपरफास्ट गाडीला असलेल्या डब्यानी बदलण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या माहितीला रेल्वे प्रशासनाकडून अजूनही दुजोरा मिळाला नसला तरी ही याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

आणखी वाचा-Girish Mahajan : “छगन भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही”, गिरीश महाजनांचं मोठं विधान

एलएचबी पद्धतीचे डबे आणि प्रवाशांची गर्दी

पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या प्रचलित धोरणानुसार डबल डेकर डब्यांचे आयुष्य २० वर्षांचे असून वलसाड फास्ट पॅसेंजरला असणारे डबल डेकर डबे काढून त्या ऐवजी लवकरच एलएचबी पद्धतीचे डबे बसवण्याचे पश्चिम रेल्वे विचाराधीन आहे. एका एलएचबी डब्यांमध्ये १०२ ते १०८ आसन क्षमता असून डबल डेकर डब्यांऐवजी एलएचबी डबे वापरात आले तर या डब्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी उफाळून येईल अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय डबल डेकर डब्यांचे रुंद दरवाजे प्रवाशांसाठी सोयीस्कर असून त्या डब्यांच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत भाजी, फळ, दूध विक्री करणाऱ्यांना सामान ठेवणे सोयीचे ठरत असल्याचे देखील सांगण्यात येते.

डबलडेकरचे उत्पादन बंद

आयसीएफ कंपनीने विनावातानुकूल यंत्रणा असणारे डबल डेकर डबे उत्पादन करण्याचे बंद केल्याने वलसाड फास्ट पॅसेंजरसाठी तातडीने नवीन डबल डेकर डबे मिळण्याची शक्यता धूसर वाटत आहे. तर एलएचबी डब्यांमध्ये प्रवाशांसाठी अधिक सुविधा असून हे डबे सुरक्षित असल्याने पश्चिम रेल्वे डबल डेकर डब्यांच्या गाडीला सिंगल डेकर एलएचबी डब्यांच्या गाडीमध्ये परिवर्तत करणे भाग पडत आहे, असे सांगितले जाते.

दैनंदिन प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम

अस्तित्वात असणाऱ्या डबलडेकर डब्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी फ्लाईंग राणी सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीला असणाऱ्या डबल डेकर डब्या एवजी एलएचबी डब्यांची जोडणी करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयींना व त्रासाला सामोरे जावे लागत असून निदान बलसाड फास्ट पॅसेंजर मध्ये डबल डेकर डब्यांची सुविधा सुरू ठेवावी यासाठी प्रवासी प्रयत्नशील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Story img Loader