लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : नवी मुंबई महानगरपालिकेला विश्वासात न घेता बदल केल्याच्या अनुषंगाने आपण विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्री यांच्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण आमदार गणेश नाईक यांनी पालघर येथे केले. विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी नवी मुंबईच्या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून या सर्व प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघेल असा आशावाद नाईक यांनी व्यक्त केला.

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत पत्रकारांना माहिती देण्याच्या दृष्टीने आमदार गणेश नाईक यांनी मनोर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्यातील अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये नमूद करत केंद्र व राज्य सरकार शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी व विशेषतः महिलांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी पालघरचेनवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा-पालघर: सफाळेतील जेटीचा मार्ग मोकळा, वन विभागाची जागा सागरी मंडळाकडे वर्ग करण्यास सरकारची परवानगी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत झालेल्या निर्णयांचा अनादर करताना सिडको तर्फे अंमलात आणलेल्या काही निर्णयांबाबत मुख्यमंत्री यांच्या समवेत झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे सिडको अधिकाऱ्याने स्मरणपत्र देऊन देखील दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने आपल्याला त्याविषयी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करावा लागल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री यांना राज्यातील कानाकोपऱ्यातून दररोज हजारो पत्र येत असतात. मात्र आपण दिलेल्या पत्र व स्मरणपत्रांचे गांभीर्य अधिकारी वर्गाने लक्षात घेतली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण विधिमंडळात काहीही खोटे बोलले नसलो तरीही आपला रोख मुख्यमंत्री यांच्याकडे नसून मुख्यमंत्री यांच्या सूचनांचे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकावरी वर्गाकडे असल्याचे सांगत सावरासावर केली. नवी मुंबईच्या समस्या संदर्भात सोमवारी ना. उदय सामंत यांच्याबरोबर पुन्हा बैठक होणार असून अधिवेशन संपण्यापूर्वी आपण यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत बैठकीत तोडगा निघेल आश्वासन देण्यात आले असल्याचे पत्रकारांना सांगितले.

आणखी वाचा-रिक्षा अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यु; चालकासह पाच प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी

पालघर येथे जिल्हा मुख्यालय उभारताना सिडकोला देण्यात आलेले झुकते माप, सिडको ने उभारलेल्या मुख्यालयाच्या इमारतींच्या दर्जाबाबतची समस्या, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग काँक्रीटीकरण्याच्या दर्जाबाबत उपस्थित केलेले प्रश्न, क्रीडा विभागासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता, पालघरच्या पर्यटन विकासासाठी मंजूर केलेल्या निधीची रत्नागिरी जिल्ह्याकडे केलेली वर्गवारी तसेच केंद्र व राज्याच्या योजना अंमलबजावणी करण्यास अधिकारी वर्गाची उदासीनता इत्यादी प्रश्नाबाबत आपल्याला लिखित स्वरूपात देण्याचे आवाहन करत त्याचा तातडीने पाठपुरावा केला जाईल असे आमदार गणेश नाईक यांनी आश्वासन दिले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My statement was not for cm eknath shinde says ganesh naik mrj
Show comments