नीरज राऊत
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यासह आतापर्यंत झालेल्या अपघातांच्या कारणांचा शोध घेतला असता अपघातांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तसेच देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून अनेक सुरक्षा बाबींकडे होणारे दुर्लक्ष तसेच असंवेदनशीलता जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.
महामार्गाचा ११० किलोमीटर लांबीचा पट्टा पालघर जिल्ह्यात असून दोन ठिकाणी टोल नाके आहेत. असे असताना महामार्ग प्राधिकरण तसेच देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे एकही कार्यालय जिल्ह्यात नाही. याचबरोबरीने सुरत येथील कार्यालय महामार्ग प्राधिकरणाने भरूच येथे हलविले आहे. एकंदरीत तक्रार नोंदवण्यासाठी किंवा महामार्गावरील त्रुटी वरिष्ठांच्या नजरेत आणून देण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्याचे येथे दिसते.
सहापदरी महामार्गाचा अनेक ठिकाणी भाग चौपदरी होत असल्याने रस्त्याची रुंदी अचानकपणे कमी होत असल्याचे सूचनाफलक किंवा रिफ्लेक्टरसारखी सतर्क करणारी व्यवस्था नसल्याने अपघात घडतात. महामार्गावर दुभाजकांमध्ये छेद ठेवून गाडीला वळण्याची मुभा आहे त्या ठिकाणी वाहन चालकाला सतर्क ठेवण्यासाठी व्यवस्था अनेकदा अकार्यक्षम असल्याचे दिसून येते. महामार्गावर काही ठिकाणी स्थानिकांनी किंवा हॉटेल मालकांनी वैयक्तिक लाभासाठी विनापरवाना वळण निर्माण केले आहे. मात्र अशा अपघातप्रवण भागांची गस्त (पेट्रोलिंग) घालणाऱ्या व्यवस्थेकडून अहवाल देणे दुर्लक्षित राहत आहेत.
महामार्गावर काही अपघातप्रवण ठिकाणी नवीन उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यांचे काम रखडले आहे. इतर अनेक अपघातप्रवण क्षेत्राकरिता पुलाची मागणी अजूनही विचाराधीन घेण्यात आलेली नाही. महामार्गालगत असणाऱ्या गजबजलेल्या ठिकाणी सेवा रस्त्यांचे काम अपूर्ण असून काही सेवा रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग केले जात असून त्याकडेदेखील महामार्ग देखभाल यंत्रणा लक्ष देत नाही. महामार्गावर एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास किंवा वाहन मधेच बंद पडल्यास मदतकार्यासाठी पूर्वी कार्यरत केलेली संपर्क यंत्रणा पूर्णपणे ठप्प आहे.
पावसाळय़ात अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडून वाहनांचे अपघात घडले आहेत. मात्र ते भरण्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वेळ मारून नेण्यात आली होती. महामार्गाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेने पावसाळय़ापूर्वीच गौण खनिज वस्तूंचा साठा का केला नाही याची विचारणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करणे अपेक्षित आहे.महामार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाते. मात्र या कारवाईला गैरप्रकारांची छटा आली आहे. अवजड वाहनांसाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या मार्गिके (लेन) वरून प्रवास करणे अपेक्षित असताना अनेक अवजड वाहने पहिल्या व दुसऱ्या मार्गिकेवरून चालवीत असल्याने लहान वाहने तिसऱ्या मार्गिकेवरून प्रवास करताना अपघात घडताना दिसतात.
महामार्गाने अपघातग्रस्तांना तातडीने औषधउपचार मिळवण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारणे अपेक्षित होते. सध्या बहुतांश भाडय़ाच्या रुग्णवाहिका, क्रेनद्वारे मदतकार्य केले जात असल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. या महामार्गावर केल्या जाणाऱ्या लेखापरीक्षणांमधून प्राप्त होणाऱ्या अभिप्रायांवर तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. महामार्गावर असणाऱ्या अपघातप्रवण क्षेत्राचे ह्णब्लॅक स्पॉटह्णह्णमध्ये रूपांतर होण्यापासून टाळण्यासाठी अपघाताचे ठिकाण बदलण्याचे प्रकार घडल्याचे आरोप होत आहेत. महामार्ग उभारणी करताना त्यामध्ये राहिलेले सदोष अभियांत्रिकी रचनांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडत असले तरी ही एनएचएआय आपली जबादारी झटकण्यासाठी अपघातग्रस्त वाहन भरधाव असल्याचे किंवा चालकाने मद्यपान केल्याचे कारण अनेकदा पुढे करण्यात येते. अपघातप्रवण क्षेत्रात क्रॅश बॅरियरसारखे संरक्षक उपाय योजनांकडे दुर्लक्ष केले जात असताना टोल वसुली मात्र नियमितपणे केली जात असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी असंवेदनशील झाल्याचे आरोप केले जात आहेत.
अपघातप्रवण मुख्य ठिकाणे
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड फाटा ते अच्छाडपर्यंत २९ अपघातप्रवण ठिकाणे अपघातपूर्व क्षेत्र म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. यामध्ये सकवार उड्डाणपूल, ढेकाळे वाघोबा खिंड, वरई फाटा उड्डाणपूल, -सातीवली क्रॉसिंग, हालोली गाव, मॅकडोनाल्ड पाटील पाडा, दुर्वेस वैतरणा नदी पूल,-मस्तान नाका पूल, जव्हार फाटा क्रॉसिंग, नांदगाव क्रॉसिंग, आवढाणी क्रॉसिंग, मेंढवण खिंड, मेंढवण वळण, सोमटा पूल, तवा गाव क्रॉसिंग, सूर्या नदी पूल, चारोटी फ्लायओवर, एशियन पेट्रोल पंप क्रॉसिंग, महालक्ष्मी मंदिर उड्डाणपूल, धानीवरी गाव, आंबोली वळण, आंबोली क्रॉसिंग, वडोली क्रॉसिंग, सूत्रकार फाटा, सावरोली गाव या ठिकाणांना सातत्यपूर्ण अपघात होणाऱ्या जागांचा समावेश आहे.
ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला तो ब्लॅक स्पॉट नव्हता. किंबहुना त्या नदीवर असणाऱ्या पुलावर सात मार्गिका उपलब्ध होत्या. मुंबईकडे जाण्याच्या दिशेने तीनपदरी मार्ग दुभागला जात असल्याने एक लहानसे वळण निर्माण झाले असून वाहन भरधाव असल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे. चारोटी व मेंढवन येथील उड्डाणपूल तसेच इतर अपघातप्रवण क्षेत्राच्या भागांमध्ये अपघातांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी तांत्रिक बाबींवर तज्ज्ञांकडून अभ्यास सुरू आहे. – सुरज सिंग, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भरूच