नीरज राऊत
पालघर : सवलतीच्या दराने शेतकऱ्यासाठी उपलब्ध होणाऱ्या युरिया उद्योगांमध्ये कच्चामाल म्हणून वापरला जात असल्याचे केंद्र शासनाने कृषी विभागाच्या आयुक्त कार्यालयाला सूचित केल्यानंतर पालघर जिल्ह्यतील युरिया वापराकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विभागाने केलेल्या दुकानदारांच्या सर्वेक्षणात दोन दुकानांमध्ये अनियमितता आढळली असून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शेतकरम्य़ांकडून खताची मागणीचे गावनिहाय सर्वेक्षण केल्यानंतरच जिल्ह्यत नव्याने युरिया खत उपलब्ध होणार आहे.
भात पिकाकरिता प्रति हेक्टरी १०० नत्र, ५० स्फुरद व ५० पालाश असे सूत्र कृषी विद्यपीठाने सुचविले आहे. तरीही खरिपात भात उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यंच्या तुलनेत पालघर जिल्ह्यतील खताचा हेक्टरी वापर अधिक असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यतील तसेच जिल्ह्यबाहेरील सवलतीच्या दरात खत औद्योगिक वापरात येत असल्याचा संशय आल्याने २३ मे पासून कृषी आयुक्त कार्यालयाने पालघर जिल्ह्यसाठी युरिया खताचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी विभाग तसेच जिल्हा परिषद कृषी विभागाकडून एप्रिल महिन्यापासून विक्री झालेल्या युरिया खताची माहितीच्या आधारे लेखापरीक्षण करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यतील खत विक्री करणारम्य़ा २७९ दुकानांची तपासणी पूर्ण झाली आहे. दुकान बंद असल्याचे भासवून पॉस मशीनद्वारे खताची नियमित विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचा पोलिसांमार्फत तपास सुरु आहे. तर इतर अनेक दुकानांमध्येही वेगवेगळ्या प्रकारची तफावत आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.
आगामी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताची मागणी शेतकरी निहाय नोंदवण्याचे काम कृषी विभाग तसेच जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सुरू असून ही मागणी एकत्रित करून पडताळणी केल्यानंतरच नव्याने मागणी नोंदवून खरीप हंगामासाठी युरिया उपलब्ध होईल अशी स्थिती आहे. आगामी खरीप हंगामासाठी पंधरा हजार मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली होती, त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १८ हजार मेट्रिक टन युरियाच्या मागणी असताना १८ हजार ९३० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. एप्रिल महिन्यामध्ये उपलब्ध असणारम्य़ा ४८२२ मेट्रिक टन युरिया पैकी २७२२ मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून उर्वरित २१०० मेट्रिक टन पैकी ७४२ मेट्रिक टन युरिया बफर स्टॉक म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यतील भाताची उत्पादकता सरासरी २४०४ किलो प्रति हेक्टर इतकी आहे. पालघर जिल्ह्यत गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पाहता ७४८ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जात असून १६४९ मेट्रिक टन भाताचे उत्पादन झाले आहेसन २०२१-२२ व्या वर्षांत ८६० हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवडीचे लक्षांत ठेवण्यात आले असले तरी ७९८ हेक्टरक्षेत्रात प्रत्यक्षात लागवड होऊन १४२४ मेट्रिक टन भाताचे उत्पादन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
उपलब्ध साठा तरी चिंता
गेल्या दोन दिवसांपासून पावसाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असून भात बियाणे रोपवाटिकेत लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रोपवाटिकेला लागवड क्षेत्राच्या १० टक्के जागा वापरली जात असून त्यासाठी आवश्यक असणारे युरिया जिल्ह्यकडे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. आवश्यकता भासल्यास बफर साठा उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र युरिया साठा निवडक दुकानात उपलब्ध असून अनेक खत विक्री करणारम्य़ा दुकानांमध्ये साठा उपलब्ध नसल्याने शेतकरम्य़ांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शेतकरम्य़ांची होणारी गैरसोय
पावसाळ्यापूर्वी भात बियाणे खरेदी करताना शेतकरी खत, अवजारे व शेतीला लागणारी इतर वस्तू एकत्रितपणे खरेदी करत असतात. यंदाच्या वर्षी युरिया खताची आवश्यकता भासण्यास व नव्याने खत उपलब्ध होण्यास जून महिन्याचा आखेर उजाडणार असल्याने शेतकरम्य़ांना खत खरेदीसाठी पुन्हा एकदा खरेदीच्या ठिकाणी यावे लागणार आहे.
सर्वेक्षणानंतर खरी परिस्थिती समोर येणार
शेतकऱ्यांकडून एप्रिल महिन्यानंतर खरेदी केलेल्या खताची खातरजमा केल्यानंतर प्रत्यक्षात पडताळणीत मिळालेले खत योग्य पद्धतीने व शेतीच्या कामासाठी वापर झाला होता का याची माहिती उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणानंतर दुकानदारांकडून तसेच पॉस मशीन भरून उपलब्ध होणाऱ्या माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधितांचे म्हणणे ऐकून आवश्यकता भासल्यास गुन्हे दाखल करू अशी भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.