नीरज राऊत
पालघर : समुद्रकिनाऱ्यालगत वसलेल्या तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या परिसरात गेल्या काही दिवसांत संशयास्पद वस्तू तसेच ड्रोनच्या हालचाली दिसून आल्याने तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. अणुऊर्जा प्रकल्प समुद्रकिनारी वसलेला असून संरक्षणदृष्टय़ा हा भाग संवेदनशील मानला जातो. काही वर्षांपूर्वी केंद्राच्या परिसरात तेल उत्खनन, व्यवस्थेतील (रीग)अवाढव्य पाइप, सागाच्या लाकडाचे मोठे ओंडके तसेच बोटींवर इशाऱ्यासाठी असणाऱ्या वस्तू केंद्राच्या लगतच्या किनाऱ्याच्या भागात आढळल्या होत्या.
वाढवण परिसरात २५ जून रोजी रात्रीच्या वेळी काही ड्रोन आकाशात फिरत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. संबंधित विभागाकडील चौकशीत ड्रोन उडविण्यात आले नसल्याची माहिती मिळते. केंद्राच्या परिसरातील ‘नो फ्लाइंग झोन’च्या जवळपास ड्रोनचा सर्रास वावर झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. १ जुलै रोजी वाढवण तिघरेपाडा परिसरात किनाऱ्यावरील संशयास्पद वस्तू एक महिला घेऊन जात असताना काही अंतरावर त्यामधून फटाक्यासारखा धूर निघाला होता. वाढवणपासून केंद्र जवळ असल्याने आगामी काळात येथे बंदर उभारणी झाल्यास केंद्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रश्न निर्माण होतील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा दुजोरा
वाणगाव पोलिसांशी संपर्क साधला असता समुद्रकिनाऱ्यावर १ जुलै रोजी आढळलेल्या वस्तूंविषयी पोलिसांकडे माहिती नसल्याचे सांगितले. मात्र केंद्रीय गुप्तचर विभागाशी संपर्क साधला असता अशाच प्रकारचे सिग्निलग डिव्हाइस पश्चिम किनारपट्टीवर वाढवणसह इतर ठिकाणी आढळल्याचे सांगितले असून नौदल किंवा तटरक्षक दलाकडून असे उपकरण सोडण्यात आले असल्याची शक्यता सांगून या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले.