पालघर: पालघर तालुक्यातील सफाळे रामबाग येथे आज सकाळी तीन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. या अपघातात विळंगी गावातील दुचाकीस्वार विक्रम कमलाकर पाटील (२१) याच्या मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने आज पहाटे जिल्ह्याच्या विविध भागात दाट धूके पसरले होते. मृत झालेला दुचाकी स्वार विक्रम हा मुंबईत रात्रपाळी करुन सफाळेहुन विळंगी कडे जात असताना रामबाग जवळ धुक्यामुळे समोर काही न दिसल्याने दुचाकीला धडक दिली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या दुचाकी चालकांनी दोन दुचाकीला धडक दिली. त्यामुळे हा तीन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. या अपघातात विक्रांत पाटील हा जखमी अवस्थेत असताना सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. त्याचप्रमाणे विलंगी गावातून येणारे प्रकाश गजजान किणी (५८), पल्लवी प्रकाश किणी (४६) हे पती-पत्नी व माकुणसार येथील जयदीप वर्तक गंभीर जखमी झाले.

हेही वाचा… पालघर : मराठी फलक लावण्यासाठी दोन दिवसांची मुभा, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागृती करणार

या अपघाताची माहिती सफाळे पोलीसांना मिळतात घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सफाळे पोलीस ठाण्यात अपघाती नोंद करण्यात आली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person died and three others were injured in an accident involving three two wheelers at safale rambagh in palghar dvr