पालघर : पालघर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे काम वर्षभरापासून प्रलंबित राहिले आहे. ३० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात ३२ खाटांची अतिरिक्त सुविधा करण्यात आली असली तरी मनुष्यबळाची समस्या व या बाबतचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने नव्याने निर्मित सुविधा गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडून आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालघर येथे जिल्हा निर्मिती झाली त्यावेळी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात होते. करोनाकाळात या रुग्णालयातील उपलब्ध जागेमध्ये १० अतिरिक्त खाटांची हंगामी तरतूद करण्यात आली होती. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच जिल्हा मुख्यालय ठिकाणी सामान्य रुग्णालय नसल्याने या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या सुविधांचा विस्तार करण्याचा विचार पुढे आला.
पालघर येथे डॉ. दिगंबर झवर यांच्या पुढाकाराने कमला फॉउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर नव्याने बांधकाम करण्यात येऊन ३२ खाटा आणि इतर आवश्यक सुविधांसह विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये चार जनरल वॉर्ड, दोन विशेष कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी कक्ष तसेच नर्सिग स्टेशन तयार करण्यात आले आहेत.
सामाजिक दायित्व विभागाच्या अंतर्गत करण्यात विद्युतीकरण, इतर वैद्यकीय सामग्री, उद्वाहन, शौचालय उभारणी, दोन्ही मजल्यावरील नव्याने फरशीचे काम करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारात पेवर ब्लॉक बसवणे, रुग्णालयाची डागडुजी करून त्याला रंगरंगोटी करणे व संपूर्ण आवाराला कुंपण घालण्याचे काम करण्यात आले आहे. या कामांची सन २०२१ मध्ये सुरुवात होऊन ती जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आली.
नव्याने उभारण्यात आलेली सुविधा अजूनही रुग्णसेवेसाठी वापरात आलेली नाही. याकरिता लागणारे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सुविधा कार्यान्वित करणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. पालघर ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा विस्तारित करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित करणे तसेच त्या अनुषंगाने नवीन मनुष्यबळाची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या रुग्णालयाचा विस्तारित भाग कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च करून निर्माण केलेली व्यवस्था आजही पालघरमध्ये धूळ खात पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अहवालाची प्रतीक्षा
ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित करण्याच्या दृष्टीने ६० खाटांची क्षमता निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मनुष्यबळाची पूर्ततेनंतर विस्तारित रुग्णालय सुरू करण्यात येईल, असे पालघरचे शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले. एप्रिल ते डिसेंबर २०२२ दरम्यान रुग्णालयात २५१ सिझेरियन, ५२२ सर्वसाधारण प्रसूती व ३५० लघुशस्त्रक्रिया करण्यात आल्या. सोनोग्राफी सुविधा असल्याची माहिती त्यांनी दिली.
ब्लड बँक विभागात बदलांची गरज
ग्रामीण रुग्णालयाच्या एका भागावर उभारण्यात आलेल्या रक्तपेढीच्या छतावर पत्रे बसवण्यात आले असून त्या भागातील तापमान दिवसा वाढत असल्याने रक्तपेढीसाठी उपयुक्त नसल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी नव्याने फॉल्स सीलिंग बसून इतर आवश्यक बदल करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. या कामाकरिता आवश्यक निधी जिल्हा विकास समितीकडून मंजुरी मिळवून कामाला आरंभ करण्यात येईल असे सांगण्यात आले.