पालघर : केळवे रेल्वे स्थानकापासून जवळच असणाऱ्या माँ ममता गोल्ड या दागिन्यांच्या दुकानात गुरुवारी सायंकाळी तीन अज्ञात आरोपींनी बंदुकीचा धाक व दगडफेक करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सराफ दुकानदाराने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने तीन अज्ञात आरोपींनी तेथून पळ काढला.
गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास केळवे रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या सराफाच्या दुकानात खरेदीकरिता गर्दी होती. यावेळी दुकानाबाहेर ३ अज्ञात आरोपी दुकान लुटायच्या तयारीत आले होते. त्यातील एका आरोपीने मारण्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला असता दुकानदाराने लाकडी दांडका काढून आरडाओरडा केला. यादरम्यान आरोपीने दुकानाबाहेर जाऊन तिन्ही आरोपींनी एअरगनचा आवाज करून दुकानाच्या काचांवर दगडफेक केली. मात्र आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने चोरांनी तेथून पळ काढला.
पालघर जिल्ह्यात केळवे रेल्वे स्टेशन पासून जवळच असणाऱ्या माँ ममता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानात गुरुवारी सायंकाळी तीन अज्ञात आरोपींनी बंदुकीचा धाक व दगडफेक करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सराफा व्यापाऱ्याने केवळ दंडुक्याच्या आधारे बंदुकधारी दरोडेखोरांना हुसकून लावले. ( Viral… pic.twitter.com/X7Vd3jUngg
— LoksattaLive (@LoksattaLive) March 28, 2025
याबाबत सफाळे पोलीस ठाण्यात जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे सफाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले.