पालघर : पालघर औद्योगिक वसाहतीतील सफायर लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या औषधनिर्मिती कंपनीतील कामगार सुखरूप असले तरी कंपनी आगीत जळून खाक झाली आहे.

पालघर बोईसर मार्गावरील पालघर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास सफायर लाइफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पॅकिंग विभागात आग लागली. अग्निशमन व्यवस्था उपलब्ध न झाल्याने आग पसरली. तोवर या कंपनीमधील ४५० कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. साडेतीन वाजताच्या सुमारास या कंपनीतील ज्वलनशील रसायन साठवणूक केलेल्या, वातानुकुलीत यंत्रणेचे कॉम्प्रेसर, ड्रम स्फोट झाल्याने या आगीने भीषण रूप घेतले व आग कंपनीभर पसरली.

Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
A major fire broke out at a plastic factory in Bhosari
पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
thane fire breaks out in laundry shop
ठाण्यात मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना, इमारतमधील लॉन्ड्री दुकानात आग लागल्याने सर्वत्र पसरला होता धूर
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
Massive fire breaks out in building in sion
शीवमधील इमारतीला भीषण आग
Massive fire breaks out in 13 floor building in Andheri Mumbai
अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले

हेही वाचा – मुसळधार पावसाने डहाणू बस स्थानक आणि आगारात पाणी घुसल्याने अनेक बस रद्द, प्रवाशांचे हाल

ही आग विझविण्याकरिता पालघर, तारापूर औद्योगिक वसाहत, अदानी पावर डहाणू व वसई विरार महानगरपालिका येथील एकूण सहा अग्निशमन बंबाना पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात आणण्यासाठी चार तासांपेक्षा अधिक अवधी लागला. या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरीही कंपनीचे संपूर्णतः नुकसान झाले आहे.

हेही वाचा – शहरबात : सुरक्षिततेबाबत चिंता

आग लागली तेव्हा पालघर शहराच्या अग्निशामक दलाची गाडी वाडा येथे गेली असल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. मात्र ही अग्निशमन व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत सव्वा ते दीड तासांचा अवधी लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. कंपनीमध्ये सर्वत्र तयार व कच्चा मालाची ठेवण्यात आल्याने तसेच अग्निशमन व्यवस्थेला मध्ये जाण्यासाठी मोकळी जागा नसल्याने आग विझवण्यात अनेक अडथळे आले. जिल्हाधिकारी गोविंद बोडके, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय अधिकारी सुनील माळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेक कदम व इतर अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन आगीवर नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन व समन्वय साधला.

Story img Loader