नीरज राऊत

पालघर: पालघर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका पूर्वीच्या तुलनेत सुमारे तिप्पट दराने गेल्या पाच महिन्यांपासून कार्यरत असताना कचरा उचलण्याची कार्यक्षमता अभ्यासण्याबाबत पालघर नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराला मोकळे रान मिळाले आहे. करदात्यांच्या पैशावर नगर परिषदेचे कर्मचारी व ठेकेदार लयलूट करत असून नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

पालघर नगर परिषदेने शहरातील स्वच्छता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व व पश्चिम पट्ट्यासाठी स्वतंत्रपणे कचरा उचलण्याचा ठेका नगर परिषदेने मे २०२३ पासून अमलात आणला. त्यामुळे पूर्वी कचरा ठेक्यावर होणारा १५ ते १७ लाख रुपयांचा खर्च ४६ ते ५० लाखांपर्यंत पोहोचला. या संदर्भात लोकसत्ता मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगराध्यक्ष व तत्कालीन आरोग्य सभापती यांनी कचरा उचलण्याची क्षमता व एकंदर शहरातील स्वच्छता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारी यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगत तसेच सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन व इतर सुविधा पुरवल्या जातील अशी भूमिका स्पष्ट केली होती.

हेही वाचा >>> स्मशान हे ठरले उत्सवाचे ठिकाण; अवयव व देहदानाच्या जागृती संदर्भात सफाळ्यातील “स्मशान एक जंक्शन” कार्यक्रम

कचरा उचलण्याच्या नवीन ठेकेदारांनी १३०० किलो क्षमता असणाऱ्या १६ तर तीन टन कचरा उचलण्याची क्षमता असणारी चार नवीन वाहने या कामासाठी कार्यरत केली. मात्र अवघ्या चार महिन्यांच्या अवधीमध्ये २० नवीन वाहनांपैकी आठ वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निसपन्न झाले आहे. बंद पडलेले प्रत्येक वाहन काही दिवस बंद राहिले असताना त्याबाबतची माहिती नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना नसल्याचे दिसून आले आहे.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून नवीन ठेकेदार व परिवेक्षक यांच्या देखरेखिखाली शहरातील स्वच्छता राखण्यासाठी १०७ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याद्वारे हजेरीची नोंद होत असली तरीही या कर्मचाऱ्यांकडून नेमके कोणत्या ठिकाणी व किती काम झाले याचा तपशील नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांपैकी तीन आरोग्य कर्मचारी जिल्हाधिकारी यांच्या सेवेत, दोन तहसील कार्यालयात व एक कर्मचारी बगीचे सफाईसाठी तैनात असल्याची माहिती पुढे आली आहे. आरोग्य विभागाकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नसल्याने नगर परिषदे कडून होणाऱ्या स्वच्छतेच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यरत नसल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा >>> पालघरमधील रुग्णांची गुजरातवर भिस्त; आरोग्यसेवेकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

जीपीएस तंत्रज्ञानाने सज्ज असणाऱ्या गाड्यांची कार्यक्षमता वाढून या कचरा उचलणाऱ्या गाड्यांकडून आठ तासात किमान तीन ते चार फेऱ्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र पूर्वीच्या कचऱ्याच्या ठेकेदाराप्रमाणे नवीन व्यवस्थेतील कचरा उचलणाऱ्या गाड्या जेमतेम दोन फेऱ्या होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर या गाड्यांच्या फेऱ्यांचा जीपीएस आलेख नगरपरिषदेकडून तपासले जात नसल्याचे अथवा बिलासोबत जोडले जात नसल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे.

पालघर शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र वजन काटा नसल्याने ५० टन क्षमतेच्या वजन काट्यावर या दीड – दोन टनाच्या गाड्यांचे वजन होत असल्याने प्रत्यक्षात वजनापेक्षा अधिक वजनाचे मोजमाप होत असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे मे महिन्यापूर्वी शहरात गोळा होणाऱ्या १५ ते १७ टन कचऱ्याच्या तुलनेत सध्या ३५ ते ४५ टन कचरा गोळा केला असल्याचा आभास निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे वजनावर आधारावर देयके देण्याची पद्धतीमुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत असले तरी त्याकडे प्रशासन व नगरसेवकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून आले आहे.

इतरही अनेक त्रुटी

कचरा व स्वच्छते संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली असली तरी या हेल्पलाइनचा क्रमांक नगर परिषद क्षेत्रात कुठेही ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.

स्वच्छतेसाठी कार्यरत असलेले मनुष्यबळ आठ तास काम करणे अपेक्षित असताना अनेकदा ही कर्मचारी मंडळी त्यापैकी चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळ कुठेतरी बसून राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामी सुरु करताना व काम संपवून निघताना होणारे चेहऱ्यावर आधारित हजेरी यंत्रणेतील मर्यादा पुढे आली आहेत

या सर्व घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा कार्यरत असली तरी त्याचा तपशील ठेकेदाराने स्वतःकडे नासिक येथील कार्यालयात ठेवल्याने नगरपरिषद, त्यांचे कर्मचारी व नगरसेवक या माहितीपासून अनभिज्ञ राहिल्याचे दिसून आले आहे.

पालघर शहराचा व्यास पाच किलोमीटर इतका असताना या घंटा गाड्यांची कार्यक्षमता वाढून या गाड्यांनी किमान तीन फेऱ्या मारणे अपेक्षित असताना या गाड्यांच्या जेमतेम दोन फेऱ्या होताना दिसतात. त्यामुळे नवीन ठेक्यातील कार्यक्षमतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घंटागाडीच्या बंदिस्त व्यवस्थेमुळे संपूर्ण घंटागाडी कचऱ्याने भरणे शक्य होत नाही. त्यामुळे सुक्या कचऱ्याचा बहुतांश समावेश असणाऱ्या घंटागाडीत १२०० ते १५०० किलो कचरा कसा मावतो हा संशोधनाचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे ही बाब आजवर कोणत्याही नगरसेवकाने तपासून घेतला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

कचरा उचलण्याच्या ठेक्यां संदर्भात प्राप्त असलेल्या प्रशासकीय मान्यतेच्या अधीन राहून कचऱ्याची देयके देण्यात येत आहेत. शहरातील कचरा उचलण्याचे काम सुधारण्यासाठी तसेच या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी मनुष्यबळाची मर्यादा आहे. या ठिकाणी त्रुटी दूर करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे अधिक कसोशीने प्रयत्न केले जातील.

– डॉ. पंकज पवार पाटील, मुख्याधिकारी पालघर