पालघर: पालघर नगर परिषदेच्या संकेतस्थळावरील मालमत्ता कराचे ऑनलाइन भरणा केंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन भरणा केंद्राच्या माध्यमातून कर भरणे सहज सोयीचे जात होते. मात्र ऑफलाइन पद्धतीने कर भरण्यासाठी रांगा व वेळ, भाडे खर्च होत आहे.

नागरिकांना मालमत्ता कर व इतर कर भरण्यासाठी सहज सोपे जावे यासाठी नगर परिषदेच्या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन कर भरणा केला जात होता. ऑनलाईन कर भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र अचानक दोन-तीन महिन्यांपासून ही प्रणाली बंद पडल्याने नागरिकांना ऑफलाइन भरणा करावा लागत आहे. ऑनलाइन प्रणालीमध्ये नागरिक वेळेवर कर भरत होते. मात्र ऑफलाइनमुळे वेळेवर कर न भरता आल्याने नगरपरिषदेचेही मोठे नुकसान होत आहे.

unauthorized hawkers, Andheri,
अंधेरीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा; परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेची कार्यवाही
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
iron benches stolen from the municipal gardens at vashi
नवी मुंबई: उद्याने, पदपथ, निवारा शेडमधील लोखंडी आसने चोरीला, गजबजलेल्या वाशीतील घटनेमुळे सीसीटीव्ही यंत्रणेबाबत साशंकता
एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प
maharera issue model guidelines to regulate senior citizen housing projects
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
ST services disrupted across the state ST organization meeting with Chief Minister
एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
Pune, Agricultural Produce Market Committee, weighers, salary delay, weighers salary delay in pune
संचालकांच्या राजकारणामुळे मार्केटयार्डातील तोलणारांची आर्थिक कोंडी, वेतन थकल्याने २६ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन
Traffic congestion at different place in Nashik city
नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

ऑनलाइन करभरणा प्रणाली बंद असल्यामुळे पालघर शहरांमध्ये ऑफलाइन भरणा केंद्र सुरू आहेत. मात्र पालघर नगरपरिषद कार्यालय पालघरपासून दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने नागरिकांना भाडे खर्च करून तेथे किंवा पालघरच्या तहसीलदार कार्यालया बाजूला जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना व विशेषत: ज्येष्ठ  नागरिकांची फार गैरसोय होत असून नगरपरिषद याकडे लक्ष देईल का असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच ऑनलाईन कर भरा अशा जाहिराती करून नगरपरिषद नागरिकांची दिशाभूल करीत आहे असे आरोपही नागरिकांनी केले आहेत.

नगरपरिषदेच्या   संकेतस्थळद्वारे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरता येते. मात्र अनेक महिन्यापासून बंद असलेल्या या संकेतस्थळाबद्दल विचारणा केली असता तीन महिन्यापासून एकाच प्रकारचे उत्तर ऐकायला मिळत आहे. दरवेळेस लवकरच सुरू होईल असे उत्तर ऐकून नागरिक हैराण झाले आहेत.  संकेतस्थळवरील प्रणालीचे अद्ययावतीकरण सुरू असल्याने ऑनलाइन भरणा केंद्र बंद आहेत येत्या दहा-पंधरा दिवसात काम पूर्ण होऊन हे ऑनलाइन केंद्र सुरू केले जाईल, असे पालघर नगर परिषदेच्या कर निर्धारण विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

पालघर नगरपरिषदेची ऑनलाइन कर भरणा प्रणाली अनेक महिने बंद आहे. त्यामुळे ऑफलाईन कर भरणा केंद्रावर दमछाक व त्रास होत आहे. ऑनलाइन भरणा केंद्र बंद असताना कराचा ऑनलाइन भरणा करा अशी खोटय़ा जाहिराती करून नागरिकांना त्रास देण्याचे काम नगरपरिषदमार्फत सुरू आहे.

– प्रफुल म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक, पालघर