पालघर :  पालघर पोलिसांनी चोरीचे दोन प्रकार तसेच ज्वेलर्सने ७९ ग्राहकांना गंडा लावून पलायन केल्या प्रकरणात आरोपीला अटक करून बहुतांश मालमत्ता परत मिळवण्यात यश मिळविले आहे. सफाळे येथील गणेश ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दागिने बनवणाऱ्या भागीदारी व्यवसायातील दोन इसमांनी जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान सफाळे परिसरातील ७९ ग्राहकांना दागिने बनविणे, दुरुस्ती करणे या कामी जुने सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे एक कोटी ३८ लाख रुपयांचे ऐवज जमा केला होता.

हेही वाचा >>> श्रमजीवी सत्याग्रहातील कोंडी फुटेना; सुमारे आठ हजार नागरिकांचा सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

या गुन्ह्यामध्ये एक आरोपी पोलिसांनी मे २०२३ मध्ये अटक केली असली तरीही कानाराम चौधरी हा आरोपी फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे नव्याने पदभार सांभाळाने प्रदीप पाटील व सहकाऱ्यांनी सुमारे दीड वर्ष फरार असणाऱ्या आरोपीला इंदोर येथे ताब्यात घेऊन सुमारे १७ लाख ७१ हजार रुपयांचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणातील ३९ तक्रारींचे निवारण झाले असून इतर प्रकरणात दागिन्यांची मूळ किंमत याची समेट घालण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा >>> वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी भूमिहिनांच्या जमिनीवर नांगर ?

२४ सप्टेंबर रोजी पालघर येथील हॉटेल साई रेसिडेन्सी परिसरात घरफोडी करून सुमारे २१ हजार रुपये किमतीची सोन्याची गंठण व रोख रक्कम चोरी करणाऱ्या भिवंडी येथील रहिवासी असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पालघर पोलीसांनी जुचंद्र येथून अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून हा गुन्हेगार इतर १७ मालमत्त्यांच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याची पोलिसां समोर कबुली दिली आहे. २८ सप्टेंबर रोजी पालघर येथे झालेल्या अन्य एका गुन्हा मध्ये पालघर बायपास मार्गावर इन्स्टाकार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कार्यालयात चोरी करून २० मोबाईल, पावर बॅंक असे सुमारे पाच लाख १६ हजार रुपयांच्या मोबाईल व संबंधित इतर वस्तू चोरी करणाऱ्या एका आरोपीला पालघर तालुक्यातील बिरवाडी येथून अटक केली आहे. या आरोपींनी चोरलेले मोबाईल हँडसेट, पावर बँक जमिनीत लपवून ठेवल्याचे माहिती मिळाल्यानंतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

Story img Loader