पालघर: पालघर शहरात विष्णूनगर परिसरामधील वर्धमानसृष्टी या गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास या चिमुकलीच्या नातेवाईकाने तिचे अपहरण केले पोलिसांनी अवघ्या दोन तासात चिमुकलीसह अपहरणकर्त्याला शोधून त्याला ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नुकसान झाले, परंतु सर्वेक्षण होईना!; निवडणुकांच्या कामात कर्मचारी व्यग्र; परतीच्या पावसात पालघर जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

सनी कांबळे या तरुणाने या मुलीच्या घरातून तिला फिरवण्याच्या व खाऊ देण्याच्या बहाण्याने नेले. मात्र आपली मुलगी घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर अचानक अपहरण करता सनी कांबळे यांनी या चिमुकलीच्या वडिलांना फोन करून त्यांच्याकडून एक लाखापेक्षा जास्त खंडणी मागितली. असे करताना तो आपली ठिकाण चीमुकलीसह वारंवार बदलत होता.

हेही वाचा >>> पालघरमध्ये ३३ ठिकाणी फेरमतमोजणी

मुलीचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर मुलीच्या आईने व नातेवाईकांनी पालघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपविभागीय अधिकारी नीता पाडवी, पालघरचे पोलीस ठाणे अधिकारी उमेश पाटील यांनी वेगवेगळी पथके करून मिळालेल्या माहितीच्या आधारे व आपली तपासचक्र फिरवून या अपहरणकर्त्याला केळवे येथुन चिमुकलीसह ताब्यात घेतले. त्याला पालघर पोलीस ठाण्यात आणले असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे. शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे पोलीस कर्मचारी रमेश पालवे, भगवान आव्हाड, सागर राऊत, कल्पेश पाटील आदीनी शोधकार्यात महत्वाची भूमिका घेतली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar police foiled the plan to kidnapping the child in just two hours ysh
Show comments