लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: चोरी, घरफोडी, दरोडा व इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तसेच २०१७ मध्ये मोक्का गुन्ह्यामध्ये समाविष्ट झालेल्या मुंबईतील एका सराईत गुन्हेगाराच्या टोळीला पालघर पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. गुन्हा करताना तांत्रिक तपासाचा आधार मिळू नये म्हणून दक्षता घेणारी तसेच चोरी केल्यानंतर वाहनाचा नंबर प्लेट बदलणारी ही टोळी बोईसर परिसरात जेरबंद केली असून या टोळीच्या चार सदस्यांपैकी तिघांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई

२ जानेवारी रोजी बोईसर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना एका वाहनाची नंबर प्लेट काढताना काही इसम दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर संशय बळवल्याने वाहनाची झाडझडची घेतली असता वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट व नंबर प्लेट तयार करण्यासाठी लागणारी रेडियम ची अक्षरे, क्रमांक व इतर सामुग्री त्याचबरोबर चोरी करण्याच्या दृष्टीने वॉकी टॉकी, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कटावणी, चाकू, कटर इत्यादी साहित्य सापडले.

आणखी वाचा-पालघर : राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन खिंडीजवळ कार अपघात; दोनजण किरकोळ जखमी

अंजन महंती (५१) टागोर नगर विक्रोळी, श्रावण हेगडे (४५) गोवंडी व सरोज अन्सारी (२६) गोवंडी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात तपास केल्यानंतर तारापूर, बोईसर यांच्यासह मुंबई, पुणे परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या ४४ गुन्ह्यांमध्ये यापैकी एका गुन्हेगाराचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जुईनगर नवी मुंबई येथे बँक ऑफ बरोडा येथे लगतच्या गळ्यामधून भुयारी मार्ग करून बँक ऑफ बरोडा येथे केलेल्या साडेतीन कोटीच्या चोरी मध्ये यापैकी काहींचा समावेश आहे. सहा गुन्ह्या मध्ये या आरोपांनी आपल्या सहभाग कबूल केला असून या चोऱ्यामधील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आणखी वाचा-हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकासही लोकसभेच्या रिंगणात

सन २०१७ मध्ये या टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान तुरुंगात असताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञाना विषयी अधिक माहिती घेऊन चोरी करण्यासाठी वॉकी टॉकीचा वापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. बोईसर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी घटना घडण्यापासून बचावल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. चोरी करण्यापूर्वी मोबाईल व इतर तांत्रिक तपासात वापरण्यात येणारे धागेद्वारे उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल विभूते व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्यातील आरोपी संदर्भातील पुढील तपास करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.