पालघर: तारापूर औद्योगिक वसाहती मधील सालवड शिवाजीनगर परिसरात वायुगळती झाल्याने परिसरातील नागरिकांना गुदमरल्याचे व चक्कर येण्याचे प्रकार घडू लागले.

दुपारी अडीच वाजल्या च्या सुमारास टी प्रभागातील एका कंपनीमधून अचानकपणे लाल तपकिरी रंगाचा वायु बाहेर पडू लागला. पावसाळी वातावरण असल्याने हा वायू जमीन लगत राहिल्याने त्याचा प्रभाव अधिक वाढला.

हेही वाचा…शहरबात : उशिरा सुचलेले…

पहिली पाळी संपवून दुसऱ्या पाळी साठी जाणाऱ्या कामगारांची गर्दी असल्याने रस्त्यावर असणाऱ्या काही नागरिकांना चक्कर आली. तर त्याचा प्रभाव लगत असणाऱ्या शिवाजीनगर येथील मोठ्या कामगार वसाहती वर झाल्याने काही लोकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला, इतरांनी दरवाजा बंद करून घेण्याचे पसंत केले. ही वायू गळती तारापूर येथील आरती ड्रगस लिमिटेड (टी-१५०) या कंपनीत झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली असून ब्रोमीन या वायू ची गळती झाल्याचे सांगण्यात आले.