पालघर : आदिवासी समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, जल, जंगल जमीन यावर आदिवासी, भूमिपुत्र शेतकऱ्यांचे अधिकारासाठी लढणारे, आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान तसेच भूमीसेना व आदिवासी एकता परिषदचे संस्थापक काळूराम का. धोदडे उर्फ काका यांची १० ऑक्टोबर रात्री १०.५२ वाजता यांचे मुंबई येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांचे अंतिम दर्शन व अंतिम संस्कार भूमिसेना, आदीवासी एकता परिषदेचे मनोर (दामखिंड) कार्यालयात ११ ऑक्टोबर, रोजी दुपारी २.०० वाजता करण्यात येणार आहे.
हेही वाचा : डहाणू : जन्मदात्याकडून पोटाच्या मुलीवर अत्याचार
आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी तसेच होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेक आंदोलने केली. राष्ट्रीय प्रकल्पांच्या उभारणी मुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव व भूमिपुत्र उध्वस्त होत असल्याकडे त्यांनी आंदोलनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. पाच दशकांपेक्षा अधिक काळ ते आदिवासी बांधवांकरिता चळवळीत सक्रिय होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.