पालघर : वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकर डबे बदलून त्याच्या बदल्यात सिंगल डेकर डब्यांमधून प्रवास करताना दैनंदिन प्रवासी हवालदील झाल्याचे दिसून आले. पालघर, केळवा रोड येथील अनेक प्रवाशांनी आपल्याला व आपल्या समूहाला जागा मिळावी याकरिता चक्क वाणगाव व घोलवड पर्यंत जाण्याचे पसंद केले. तरी देखील बहुतांश प्रवाशांना उभ्याने गर्दीत प्रवास करणे भाग पडले असून आज (सोमवारी) गाडी मध्ये गर्दी आणि गोंधळाचे वातावरण होते.

वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकर डबे ५ जानेवारी (रविवार) पासून बदलण्यात आले. मात्र आज कामकाजाचा पहिला दिवस असल्याने या डब्यांमध्ये दैनंदिन प्रवाशांच्या समायोजनाबाबत सर्वस्तरांमध्ये उत्सुकता होती. आपल्याला व आपल्या समूहाला व्यवस्थित जागा मिळावी यासाठी काही हौशी प्रवासी यांनी घोलवड, डहाणू व वाणगाव येथे जाऊन जागा पकडण्याचा (आरक्षित करण्याचा) प्रयत्न केला. मात्र काहींना जागा मिळाल्या तरीही बहुतांश दैनंदिन प्रवाशांना उभ्याने प्रवास करणे भाग पडले.

Tragic Accident on mumbai Ahmedabad Express Highway
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta shaharbaat Plight of railway passengers in suburban areas
शहरबात: रेल्वे प्रवासी उपेक्षित
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Vikramgad Assembly, Vikramgad Assembly Shivsena Rebellion,
पालघर : विक्रमगड विधानसभेतील शिवसेना बंडखोरीमुळे पालघरमधील महायुतीत वादाची ठिणगी
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
maharashtra assembly election 2024 eknath shinde cheated me says palghar mla srinivas vanga
एकनाथ शिंदेंनी मला फसवलं; उमेदवारी डावललेल्या आमदार श्रीनिवास वनगा यांचे वक्तव्य
maharashtra assembly election 2024 mla srinivas vanga not reachable
श्रीनिवास वनगा १७ तासांपासून नॉट रीचेबल… पुन्हा अज्ञातवासात गेल्याची चर्चा..

हेही वाचा : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी

वलसाड चे डबे बदलल्याने प्रवाशांमध्ये असणारा असंतोष उफळून येईल ही शक्यता पाहता सर्व रेल्वे स्थानकांवर जीआरपी, आरपीएफ कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. याखेरीज आरपीएफ कर्मचारी व गुप्तचर विभागाचे कर्मचारी वेगवेगळ्या डब्यांमध्ये साध्या देशामध्ये कार्यरत असल्याचे दिसून आले.

बोईसर, पालघर, केळवा रोड व सफाळा येथे गाडी आल्यानंतर आपल्या समूहातील मित्रपरिवार कुठे बसला आहे हे शोधण्यासाठी अनेकांची तारांबळ उडाली. तर इंजिन पासून पहिल्या आठ डब्यांमध्ये प्रवाशांना प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागले. विशेष म्हणजे या गाडीतुन भाजीपाला घेऊन उपनगरात जाणाऱ्या विक्रेतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. गाडीच्या मागील भागात असणाऱ्या सात सर्वसाधारण डब्यांमध्ये पालघर नंतर तुडुंब गर्दी झाली.

इतर वेळी नियमित येणारी ही दैनंदिन प्रवाशांची गाडी आज सुमारे अर्धा तास विलंबाने पालघरला आल्याने अनेक प्रवाशांनी त्यापूर्वी विलंबाने धावणाऱ्या एका जलद गाडीमधून प्रवास करण्याचे पसंद केले. तर डब्यांची क्षमता निम्म्यावर आल्याने डब्यात प्रवेश घेणे, डब्यातील वरच्या बर्थ वर बसण्यासाठी कसरत करावी लागली. नव्याने जोडण्यात आलेले डबे अस्वच्छ असल्याचे व त्यामध्ये ढेकूण असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या तर या सिंगल डेकर डब्यांमधील शौचालय अस्वच्छ असल्याचे तसेच त्यामध्ये पाणी नसल्याचे प्रवाशांकडून माहिती मिळाली. गाडी येण्यापूर्वी दैनंदिन प्रवासांमध्ये एक उत्सुकता तसेच हवालदिलपणा दिसून आला तर प्रवासादरम्यान जवळपास सर्व डब्यांमध्ये गर्दी व गोंधळाचे वातावरण असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास

सफाळ्यातील महिलांची गैरसोय

या गाडीमध्ये १२ व १३ वा डब्बा महिलांसाठी राखीव असून सफाळे येथे फलाटाचे काम अपूर्ण राहिल्याने दोन फलटा दरम्यान हा डबा आल्याने वृद्ध व गर्भवती महिलांना या डब्यांमध्ये प्रवेश करणे जिकरीचे ठरले. फलाटाचे काम पूर्ण होईपर्यंत वलसाड फास्ट पॅसेंजर मध्ये सफाळे येथून वलसाड फास्ट पॅसेंजर पकडणे आव्हानात्मक ठरणार आहे.

अलिखित आरक्षण संपुष्टात

वलसाड फास्ट पॅसेंजर मध्ये महिलांसाठी तसेच प्रथम दर्जाच्या सीजन तिकीट धारकांसाठी प्रत्येकी एक डबा आरक्षित आहे. करोनानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाल्यानंतर सर्वसाधारण डब्यांमध्ये दैनंदिन प्रवासी (मंथली सीजन तिकीट – एमएसटी) साठी असणारे आरक्षण बंद करण्यात आले होते. तरी देखील अनेक वर्ष डब्यातील विशिष्ट भागात आपण अनेक वर्षांपासून प्रवास करत असल्याचा दाखला देत अलिखित आरक्षण पद्धती कार्यान्वित होती. यामुळे अनियमित किंवा नव्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दैनंदिन प्रवासी हे दादागिरी करत बसलेल्या आसनावरून इतर प्रवाशांना उठवत असत. हीच आरक्षण पद्धती कायम ठेवण्यासाठी काही मंडळी घोलवड, डहाणू व वाणगाव येथे जाऊन आपल्या मित्र परिवाराच्या समूहासाठी जागा आढळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्या दर्जाच्या सर्वसाधारण डब्यांमध्ये झालेली गर्दी पाहता पुढील स्थानकांसाठी जागा घेऊन येण्याचे (आरक्षित ठेवणे) मनसुबे धुळीस मिळाले. त्यामुळे सर्वसाधारण डब्यातील अलिखित आरक्षण पद्धतीला डबे बदलण्याच्या क्रियेमुळे काही प्रमाणात खीळ बसली.

हेही वाचा : वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीला डबल डेकर डब्यांचा ४ जानेवारी अखेरचा दिवस

उभ्याने प्रवास

जुन्या वलसाड फास्ट पॅसेंजर ला असणाऱ्या १८ डब्यांपैकी ११ डबल डेकर डबे होते, तर नव्याने कार्यरत झालेल्या सिंगल डेकर गाडीत २२ डबे जोडले असले तरी त्यापैकी चार डबे हे अपंग, गार्ड व मालवाहतुकीसाठी असल्याने प्रत्यक्षात प्रवाशांसाठी १८ डबे उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वसाधारण अनारक्षित डब्यांची संख्या १३ असून अनेक प्रवाशांना विरार येथून गाडीत चढणे शक्य झाले नसल्याची माहिती प्रवाशांकडून प्राप्त झाली आहे. या गाडीला नव्याने जोडलेल्या डब्यांची आसन क्षमता सोबत व उभे राहण्याची क्षमता कमी असल्याने अधिकतर प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला.

Story img Loader