बोईसर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून झालेली बंडखोरी मोडीत करण्यात शिंदे यांना अपयश आलं असून यामुळे आता पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. प्रकाश निकम यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यास भाजपा कार्यकर्ते पालघर व बोईसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना उमेदवाराच्या दरम्यान अलिप्त राहण्याचे संकेत भाजपाच्या जिल्हाध्यक्ष यांनी दिले आहेत.

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी करत विक्रमगड येथे भाजप उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. प्रकाश निकम यांच्यासोबत प्रचारात अनेक शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहत असल्याने प्रकाश निकम यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केली आहे.

amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Sharad Ponkshe present on the platform of MNS meeting in Thane news
शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर
Raju Patil criticizes Eknath Shinde and his son Shrikant Shinde
जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रांवर घणाघात
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
BJP worker was stoned to death in Pavananagar in Maval
मावळातील पवनानगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून
eknath shinde
राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

हेही वाचा – Raj Thackeray in Ghatkopar : “नालायक ठरलो तर…”, राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन; म्हणाले, “सत्ता नसताना…”

प्रकाश निकम यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महायुतीच्या वतीने देण्यात आल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश निकम यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्यासोबत प्रचारात सक्रिय असणाऱ्या सहकाऱ्यांना समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भरत राजपूत यांनी केली आहे. या मागणीचा शिवसेनेने विचार न केल्यास भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे बोईसर आणि पालघर या शिवसेनेच्या वाटेला गेलेल्या विधानसभेच्या जागेसाठी काम करणार नाही, असा इशाराच यावेळी भरत राजपूत यांनी दिला.

हेही वाचा – Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

प्रकाश निकम यांच्या उमेदवारीमुळे विक्रमगडमधील भाजपाची जागा धोक्यात आली असून विक्रमगडचा बदला पालघर व बोईसरमध्ये घेण्यासाठी स्थानिक भाजपा संघटनेने दंड थोपटले आहेत. दरम्यान याबाबत प्रकाश निकम यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याबरोबर शिवसेना (शिंदे) पक्षाचा कोणताही कार्यकर्ता प्रचारात कार्यरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.