विक्रमगड तालुक्यातील नागझरीतील नागेश्वर मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नितीन बोंबाडे
डहाणू : विक्रमगड तालुक्यातील नागझरी येथील पांडवकालीन प्रसिद्ध नागेश्वर मंदिर नामशेष होण्याचा मार्गावर आहे. नूतनीकरणाच्या कामात मंदिराचे पुरातन अवशेष गडप झाले असून खाणाखुणाही पुसल्या गेल्या आहेत. राज्याच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराचे ऐतिहासिक अस्तित्व नाहीसे झाले असून याबाबत इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील नागझरी या ग्रामदान गावात पांडवकालीन जागृत नागेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या आवारात पुरातन दगडी अवशेष आहेत. हे अवशेष काही वर्षांपूर्वी उत्खननात सापडले आहेत. सापडलेल्या मूर्ती भग्नावस्थेत आहेत. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या मंदिराचे उत्खनन अजूनही बाकी आहे. लहान आणि मोठय़ा कमनीचे दगड, बांधकामांचे दगड, तोडीचे दगड, अनेक मुर्ती, अवजारे सापडल्याचे ग्रामस्थ सांगतात. पुरातन मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आणि लाकडी होते. मात्र उत्खनन करताना पुरातन मंदिराची वास्तू सद्यस्थितीत नसून नवीन बांधकामात ती पूर्णपणे नामशेष करण्यात आली आहे.
हजारो वर्षांपूर्वीची स्थापत्य आणि मूर्तीकलेचे प्रतीक असलेले नागेश्वर मंदिरचा पुरातन इतिहास नामशेष केला गेला आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या खाली अनेक ऐतिहासिक वास्तू व मूल्यवान वस्तू गाडल्या गेल्याचे एका साधूने सांगितल्याने नागेश्वर मंदिराचे खाली उत्खननाला आणि संवर्धनाला सुरुवात झाली आहे. या उत्खननात अनेक ऐतहासिक संदर्भ देणाऱ्या पुरातन मूर्ती आणि पुरातन दगडी बांधकामाचे अवशेष सापडले. मंदिराच्या खाली उत्खननात एक शंकराची पिंड सापडली. मात्र त्यापुढे खोदकाम करण्यात नागरिकांना भीती वाटू लागल्याने त्यांनी हे काम बंद केले. उत्खननात सापडलेली मूर्ती बाहेर काढल्या. मात्र, माती आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली हजारो वर्ष दडलेला इतिहास शोधण्यात पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने उदासीनता दाखविल्यामुळे या प्राचीन नागेश्वर मंदिराची उपेक्षा झाली आहे.
गरज नसताना नूतनीकरण
काही वर्षांपूर्वी आमदार निधीतून या मंदिराच्या नवीन बांधकामासाठी निधी मिळवून मंदिराचे नूतनीकरण करण्याचे काम करण्यात आले. परंतु हे काम गरज नसताना केले गेले. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु हे काम करत असताना त्यावर देखरेख ठेवणे प्रशासनाचे काम होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील ऐतिहासिक वास्तूला धक्का पोहाचला असून मंदिर या नूतनीकरणाच्या कामात पांडवकालीन इतिहासाची साक्ष पुसली गेली आहे. नवीन मंदिर बांधकामामुळे मंदिराचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि पुरातन मंदिराचे अवशेष गाडले गेले आहेत.
नागझरी हे ग्रामदान गाव आहे. ग्रामपंचायत दप्तरात पुरातन नागेश्वर मंदिराचा अहवाल शोधला असता तो सापडला नाही.
-रोहिदास डगला, सरपंच, नागझरी