रमेश पाटील
वाडा: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारम्य़ांच्या संपात सहभागी कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतरही वाडा, विक्रमगड भागातील ग्रामीण भागांत ७० टक्के बसफेऱ्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत.
वाडा, विRमगड या दोन्ही तालुक्यात २५० हुन अधिक खेडेगाव असुन येथील बहुतांश ग्रामस्थ तालुका मुख्यालयी येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बससेवेवरच अवलंबून असतो. बस कर्मचारम्य़ांच्या पाच महिन्यांच्या संपकाळात येथील ग्रामस्थ आणि विद्यर्थ्यांंना मोठय़ा प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले होते. संप कालावधीनंतर सर्व कर्मचारी कामावर हजर झालेले असतानाही वाडा आगाराच्या वाडा, विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागात धावणाऱ्या ७० टक्के बसफेऱ्या उत्पन्नाचे कारण दाखवून सुरु केलेल्या नाहीत.
ग्रामीण भागात चालणाऱ्या बसफेऱ्यामधून कमी उत्पन्न मिळते. यासाठी वाडा आगारातून पीक, चिंचपाडा, दाभोण, डाडरे, कळंभे, पिंपरोळी, आलमान, परळी, खानिवली तसेच विRमगड तालुक्यात जाणाऱ्या वाकी, शेलपाडा, बास्ते या खेडेगावात जात असलेल्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
सहा महिन्यांपूर्वी या ठिकाणी दिवसभरात बहुतांशी खेडेगावात आठ ते दहा फेऱ्या नियमित सुरु होत्या. मात्र त्या कमी करुन दोन ते तीन बसफेऱ्याच जात असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची फारच कुचंबना होऊ लागली आहे. एकीकडे बहुजन सुखाय, बहुजन हिताय असे ब्रीद घेऊन मिरवायचे आणि दुसरीकडे प्रवाशांचा अंत पाहायचा असे काम महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे सुरू असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
बेकायदा प्रवासी वाहतुकीला आवतण
एसटीच्या बसफेऱ्या कमी झाल्याने नाईलाजाने येथील प्रवाशांना बेकायदा प्रवासी वाहतूक करणारम्य़ा मॅजीक, मिनिडोअर अशा वाहनांतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट होत असली तरी वेळेवर व इच्छीत स्थळी जाण्यासाठी सेवा उपलब्ध होत असल्याने सद्य येथील ग्रामीण प्रवाशांना लालपरी ऐवजी बेकायदा प्रवासी वाहतूकच उपयोगी ठरत आहे. बसफेऱ्या बंद करुन खासगी वाहतुकीला एसटी महामंडळाने आवतण दिले आहे काय असा सवाल केला जात आहे.
अधिकचे उत्पन्न देणाऱ्याच बसफेऱ्या सुरु ठेवण्याचे आदेश वरिष्ठांकडून आलेले आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न मिळणारम्य़ा फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.-मधुकर धांगडा, आगार व्यवस्थापक, वाडा आगार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा