बोईसर : पालघर तालुक्यातील सावरे गावात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक कलहातून  वारंवार होणाऱ्या भांडणामुळे दिर आणि नणंद यांनीच आपली वहिनी आणि पुतणीची निर्घुण हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलातील ओहोळात फेकून दिले होते. याप्रकरणी दीर संदीप डावरे आणि नणंद सुमन करबट या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास पालघर तालुक्यातील सावरे गावानजीक असलेल्या ओहोळामधील पाण्यातील दगडाला बांधलेल्या अवस्थेत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

हेही वाचा >>> पालघर : आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड

पालघर तालुक्यातील सावरे हे अतिशय दुर्गम गाव असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुर्वेस या गावापासून सुमारे ११ किमी अंतरावर वसले आहे. सावरे गावातील बरडे पाडा येथील जंगलातून वाहणाऱ्या ओहोळातील पाण्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावचे पोलीस पाटील यांनी मनोर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तो वाणीपाडा येथील सुश्मिता प्रवीण डावरे या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या करून मृतदेह ओहोळातील वाहत्या पाण्यातील दगडाला बांधून ठेवण्यात आला होता. तर महिलेची मुलगी मात्र गायब होती.

हेही वाचा >>> पालघर : नेहरोली गावातील एका बंद घरात आढळले तीन मानवी सापळे, हत्या झाल्याचा संशय

मयत सुश्मिता डावरे हि आपल्या दोन वर्षाच्या मुलीसोबत गावाबाहेर असलेल्या शेतघरात राहत होती, तर तिचा पती एका मच्छीमार बोटीवर बाहेरगावी कामाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पालघर जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ माजली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या नेतृत्वाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके बनवून तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी मयत महिलेचा दीर संशयीत संदीप डावरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र  पोलिसी खाक्या दाखवताच कौटुंबिक वादातून सततच्या भांडणामुळे आपली वहिनी सुश्मिता डावरे आणि पुतणीची हत्या हत्या करून दोन्ही मृतदेह चार किमी अंतरावरील जंगलातील निर्जन भागातून वाहणाऱ्या ओहोळातील पाण्यातील दगडाला बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. यामध्ये बहीण सुमन करबट हिने देखील मदत केल्याचे आरोपीने कबुली दिली असून त्याने दाखवलेल्या जागेवरून चिमुकल्या पुतणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.