कासा : डहाणू तालुक्यात रेल्वेच्या मालवाहतूक कॉरिडॉरसाठी खडी, दगड, मुरूम असा कच्चा माल वाहून आणणारे ट्रक मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक येथून करत आहेत. वाहतुकीच्या इतर नियमांना तर धाब्यावरच बसवले गेले आहे. त्यामुळे रस्ते उखडले असून त्यांवर खड्डे पडले आहेत.
डहाणू तालुक्यामधून सद्य:स्थितीत मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉर, मुंबई बडोदा एक्सप्रेस वे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन असे तीन मोठे प्रकल्प चालू आहेत. या प्रकल्पांच्या कामासाठी वाडा, बोईसर या ठिकाणांहून खडी, दगड, मुरूम आणले जाते. परंतु हा माल येथे वाहून आणताना, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. वास्तविक माल वाहतुकीसाठी वाहनांना वजनाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. परंतु खडी, दगड यांची वाहतूक करणारे वाहनचालक ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक या रस्त्यावरून करतात. वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त वजन भरले जाते.
साहजिक ही वाहने ज्या रस्त्यांवरून धावतात त्यावर त्याचा ताण येतो. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडून, रस्ते उखडले आहेत. मालवाहतूक कॉरिडॉर परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी करावी आणि नियमबाह्य वाहतूक थांबवावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
डहाणू परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; रेल्वेच्या मालवाहतूक कॉरिडॉरच्या कामामुळे रस्त्यांवर खड्डे
डहाणू तालुक्यात रेल्वेच्या मालवाहतूक कॉरिडॉरसाठी खडी, दगड, मुरूम असा कच्चा माल वाहून आणणारे ट्रक मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक येथून करत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 30-04-2022 at 00:04 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor condition roads dahanu area pits roads work railway freight corridors amy