पालघर / बोईसर : वाढवण बंदराला स्थानिक मच्छिमार आणि शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. याप्रकरणी सरकार आणि बंदर विरोधक यांची संयुक्त बैठक आयोजित करून सर्वांचे समाधान होईल असा मध्यममार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच केंद्र सरकार हे देशाची घटना बदलणार असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात असून या अफवांना बळी पडू नका, असे प्रतिपादन केंद्रीय न्याय व सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी बोईसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

रीपाई (आठवले) पक्ष महाराष्ट्रातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन आणि विधानसभा निवडणुकीसाठी आठ ते दहा जागांची मागणी भाजपकडे करणार आहे. ॲट्रॉसिटी कायदा हा देशातील अनुसूचित जाती व जमातींना संरक्षण देण्यासाठी अमलात आणला आहे. त्याचा दुरुपयोग करून मराठा व बहुजन समाजाला विनाकारण त्रास देऊ नका, असे प्रतिपादन केंद्रीय न्याय व सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी बोईसर येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.

Kothrud Vidhan Sabha Constituency BJP Chandrakant Patil will be in trouble Amol Balwadkar Rebellion Shisvena UBT Chandrakant Mokate MNS Kishor Shinde
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
latur district, Congress Deshmukh family, Nilangekar family
काँग्रेसमध्ये देशमुख यांना एक न्याय व निलंगेकरांना दुसरा याबद्दल असंतोष
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
three major parties in maha vikas aghadi to leave 18 seats for six small parties
१८ जागांमध्ये छोट्या पक्षांत रस्सीखेच; आघाडीने दिलेली लेखी हमी उघड करण्याचा इशारा
Steering Committee Approves Maharashtra Revised Curriculum with CBSE Influence
लेख : देशांतर्गत वसाहतीकरणाचा ‘आराखडा’!
peace on border our priority pm modi tells xi jinping
सीमेवरील शांततेला प्राधान्य असावे’; जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
hitendra thakur to contest assembly election again to save bahujan vikas aghadi
विश्लेषण : हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात का उतरले? बविआला वाचवण्याची धडपड?

हेही वाचा – बचत गटाला स्वावलंबी बनवण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा अभिनव प्रयोग

केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यकर्ता मेळावा बोईसर येथील टीमा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आठवले यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश वेगाने प्रगती करित असून मोदींना पराभूत करणे हाच इंडिया आघाडीचा एकमेव अजेंडा आहे. त्यांना देशाच्या विकासाचे काही देणं घेणं नाही. इस्रोने चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यामुळे जगभरात भारताची प्रशंसा होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांत देशातील चार कोटी लोकांना पक्की घरे देण्यात आली आहेत, नऊ कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर देण्यात आले आहे, तर ८० कोटी जनतेला मोफत धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालघरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम लवकर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांमध्ये अधिकाधिक स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील शेतकरी, मच्छीमारी व १२ बलुतेदार यांच्या प्रश्नांसाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे लढले पाहिजे, असे आठवले यांनी आपल्या भाषणात सांगितले.

हेही वाचा – शहरबात : जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री एक दिलाने काम करीत असून त्यांच्यात कोणतेही मतभेद नसताना विरोधकांकडून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र मी या तिघांमध्ये कोणताही वाद निर्माण होऊ देणार नाही, अशी मिष्कील टिप्पणी रामदास आठवले यांनी केली. बोईसर येथे आयोजित मेळाव्यात विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी रीपाई पक्षात प्रवेश केला.